बाळापूर तालुक्यात अखेर श्रावण बरसला

अनिल दंदी
रविवार, 6 ऑगस्ट 2017

बाळापूर (अकोला) : पंधरा दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने बाळापूर तालुक्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र तालुक्यातील काही भाग अद्यापही कोरडा आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हातरुण, बोरगांव वैराळे, व्याळा, रिधोरा परीसरात जोरदार हजेरी लावली, तर काही भागात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या.

श्रावणमास आरंभ झाल्यापासून पावसाने दडी मारली होती. दरम्यान, काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या होत्या. मात्र, बहुतांश भागात पाऊसच नसल्यामुळे पिके सुकून जाण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शेतकरी चिंतातूर होता. आज पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या.

Web Title: akola news balapur shrawan rains monsoon

टॅग्स