प्रा. संजय खडसे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर

अनिल दंदी
सोमवार, 31 जुलै 2017

प्रा. संजय खड्से  यानी मिशन दिलासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.

अकोला : बाळापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यान्ना सन २०१६ - १७ या वर्षांचा महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभाग स्तरावरील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या महसूलदिनी १ ऑगस्टला अमरावती येथे विभागीय आयुक्त यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे .

अकोला व बाळापुर येथे केलेल्या लोकाभिमुख कामाची व सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेतली. प्रा. संजय खड्से  यानी मिशन दिलासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना मदत केली. प्रशासनामध्ये संगणकाचा वापर करून प्रशासन गतिमान केले.

सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक अतिशय तत्परतेने करतात स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन इत्यादी उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकात प्रा. खडसे लोकप्रिय आहेत. तहसीलदार असताना त्यांना 2012-13 मध्ये देखील सर्वोत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्राप्त झाला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: akola news best deputy collector khadase