भोंदू बाबाने केला विवाहितेवर बलात्कार

पंकज भारसाकडे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

तेल्हारा, (जि. अकोला): तेल्हारा पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या तळेगाव बाजार येथील एका १९ वर्षीय विवाहितेवर पंचगव्हाण येथील भोंदू बाबाने बलात्कार केल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सदर घटना गुरुवारी (ता. 12) घडली असून आज (शनिवार) विवाहितेच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी भोंदू बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

तालुक्यातील पंचगव्हाण येथील नईम बाबा असे बलात्कारीत बाबाचे नाव आहे. आपल्या पतीसाठी औषध मागायला गेलेल्या फिर्यादी विवाहितेवर बाबाने बलात्कार केला. बाबाचा पंचगव्हाण येथे दरबार भरत असून, तो  विविध आजारावर उपचार करुन कुठलाही रोग बरा करण्याचा दावा करतो.

तळेगाव बाजार येथील १९ वर्षीय विवाहिता गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास आपल्या पतीला घेऊन बाबाकडे औषध आणायला गेली होती. "तुझ्या पतीला भुत बाधा झाली असून तू काहीतरी त्याग केल्या शिवाय तो बरा होणार नाही" असे बाबाने विवाहितेला म्हटले. यानंतर त्याने पतीला बाहेर पाठविण्याचा सल्ला दिला व बलात्कार केला. याबाबत कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

विवाहितेने आज तेल्हारा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गवळी, संतोष केदासे, सागर मोरे करीत आहेत.

Web Title: akola news bhondu baba rape married women

टॅग्स