राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना सामाजिक कार्यकर्ते संबोधून फडणवीसांनी अणाजी पंताचे वारसदार असल्याचे सिद्ध केले -वंचित बहुजन आघाडी

Akola news Calling Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj a social activist, Fadnavis proved that he is the successor of Anaji Pant.
Akola news Calling Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj a social activist, Fadnavis proved that he is the successor of Anaji Pant.

अकोला : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त नमन करताना देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला. या कृतीतून फडणवीसांनी ते अणाजी पंताचे वारसदार असल्याचे सिद्ध केले, अशी टिका वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली. फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 


गेली पाच वर्षे भाजप पदाधिकारी बहुजन महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीला जाणिवपूर्वक अवमानकारक अभिवादन करणाऱ्या पोस्ट करायला सुरुवात केली आहे. त्याची पुनरावृत्ती देवेंद्र फडणवीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त केलेल्या पोस्ट मधून झाली आहे. शाहू महाराजांना "थोर समाजिक  कार्यकर्ते" असा केला होता. यातून वेदोक्त व शास्त्रोक्त पध्दतीने शाहू महाराजांचा द्वेष करणारी मानसिकता असलेल्या समुहाच्या गोटातील असल्याचे सिद्ध केले आहे. 


त्याकाळी शाहू महाराजांवर जीवघेणे हल्ले झाले, त्यांच्यावर गलिच्छ आरोप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे, छत्रपती संभाजी राजे यांना बदनाम करणारे अणाजी पंत यांचा वारसाच देवेंद्र फडणवीस चालवित असल्याचे आजच्या पोस्ट मधून सिद्ध झाले आहे. 

१४ एप्रिल रोजी राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त श्रध्दाजंली दिली होती. त्यानंतर परशुराम जयंतीला मात्र राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे अकांउटवर अभिवादन करणाऱ्या पोस्ट होत्या. बहूजन महापुरुषांच्या कर्तृत्वाचा अनादर व अवमान करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा पोस्ट भाजप नेते करीत असल्याचा आरोप पातोडे यांनी केला.

शाहू महाराजांच्या अवमानाची पोस्ट विरोधात संतापाची लहर उठल्याने फडणवीसांनी तासाभरात पोस्ट डिलीट करून नवीन पोस्ट टाकली आहे.त्यांच्या या कृतीचा वंचित बहूजन आघाडी निषेध व्यक्त करीत असून, महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. या करिता फडणवीसांनी तातडीने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com