महिलेकडून दोन दिवसांच्या बालकाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सुमय्या बी. नामक महिलेने 2 दिवसापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वार्ड नं 5 मध्ये भरती ठेवण्यात आले. सर्व काही ठिक चालू असताना रात्री ३ वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या तिच्या सोबत असलेला मुलगा इंडिका कारमधून रुग्णालयात दाखल झाले व दोन दिवसांच्या मुलास उचलून घेऊन पोबारा केला.

खामगाव : रात्री तीन वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने दोन दिवसांच्या मुलाला शासकीय रुग्णालयातून पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडल्याने संपूर्ण बुलडाणा जिल्हा हादरला आहे.

सुमय्या बी. नामक महिलेने 2 दिवसापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वार्ड नं 5 मध्ये भरती ठेवण्यात आले. सर्व काही ठिक चालू असताना रात्री ३ वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या तिच्या सोबत असलेला मुलगा इंडिका कारमधून रुग्णालयात दाखल झाले व दोन दिवसांच्या मुलास उचलून घेऊन पोबारा केला.

सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे, घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे हे रात्री ३:३० वा रुग्णालयात दाखल होऊन घटनेचे गांभिर्याने लक्षात घेता तात्काळ पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलिसांची कारवाई सुरु आहे.

Web Title: Akola news child kidnapped in Khamgaon

टॅग्स