अकोला: 60 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

अनिल दंदी
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

रिधोरा शेतशिवारात आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या गवतात एक मृतदेह असल्याचे नागरिकांना दिसले. याची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली.

अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील केवलराम पेट्रोलपंपाजवळ साठ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी आढळून आला.

रिधोरा शेतशिवारात आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या गवतात एक मृतदेह असल्याचे नागरिकांना दिसले. याची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली.

सदर मृतदेह हा अज्ञात व्यक्तीचा असून निळसर रंगाचा फुलपॅन्ट, अंगात चौकडीचे भगव्या रंगाची काॅलर असलेला पांढरा शर्ट परीधान केलेला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून ही हत्या की आत्महत्या याचे कारण बाळापूर पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Akola news death body found in Akola