अकोला: सायकल चालवत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आरोग्याचा संदेश

योगेश फरपट 
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

शासनाच्या योजना जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. अकोला जिल्हयात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभपणे मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे. आज महसुल दिनानिमीत्त स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शेतकऱ्याच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदुर गावात जाऊन शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा विषयी माहिती दिली. 

अकोला : सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी महसूल दिनानिमित्य स्वतः 12 किलोमीटर सायकल चालवत दर महिन्याच्या 1 तारखेला सायकल डे पाळण्याचे आवाहन केले आहे.

शासनाच्या योजना जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. अकोला जिल्हयात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभपणे मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे. आज महसुल दिनानिमीत्त स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शेतकऱ्याच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदुर गावात जाऊन शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा विषयी माहिती दिली. 

शेतकरी हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे, त्यामुळे शासनाने सात-बाराचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. अकोला जिल्हयात हे काम पूर्ण झाले असून हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

सकाळी 9.00 वाजता जिल्हाधिकारी हे सायकलने शासकीय निवसस्थानापासून चांदुर गावाकडे रवाना झाले. गावात बैलगाडीने फिरून त्यांनी संगणकीकृत सात-बाराची शेतकऱ्यांना माहिती देत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे त्यांचे मनोधैर्य वाढवले. या उपक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, तहसीलदार राजेश्वर हांडे, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, श्यामला खोत, तहसीलदार डॉ रामेश्वर पुरी यांचेसह सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Akola news district collector on cycle ride