अकोलाः जिल्हाधिकाऱयांनी सायकलवरून जावून दिला स्वच्छतेचा संदेश!

योगेश फरपट
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कुटुंबाच्या आरोग्यासाठी गाव स्वच्छ ठेवा ः जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

अकोला : आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपले गाव स्वच्छ करा. प्रत्येकाने शौचालय बांधून गाव हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भौरद येथे आज (शुक्रवार) आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना केले. अकोल्यापासून भौरदपर्यंत सायकलने जावून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना गाव हागणदारीमुक्त करण्यासाेबतच स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.

कुटुंबाच्या आरोग्यासाठी गाव स्वच्छ ठेवा ः जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

अकोला : आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपले गाव स्वच्छ करा. प्रत्येकाने शौचालय बांधून गाव हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भौरद येथे आज (शुक्रवार) आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना केले. अकोल्यापासून भौरदपर्यंत सायकलने जावून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना गाव हागणदारीमुक्त करण्यासाेबतच स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.

सायकल डे निमित्त स्वच्छता हीच सेवा हा संकल्प घेऊन स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करीत जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी भौरद येथे सायकलवरुन दाखल झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या सदस्य जोत्सना चौरे, संतोष वाकोडे, भौरदच्या सरपंच सविता दीघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत श्रीराम कुलकर्णी) उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार राजेश्वर हांडे उपस्थीत हाेते. आज सकाळी जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावरुन सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे आदींसह अधिकार, कर्मचारी, स्काऊट गाईड, एनसीसीचे विदयार्थी आदींसह नागरिक सहभागी झाले. भौरद गावात पोहोचल्यानंतर रॅलीचे गावकऱ्यांनी स्वागत केले. सर्वप्रथम गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गायांना टॅग लावण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. व्ही.बी.भोजने, सहायक आयुक्त डॉ. संजय पारडे हे उपस्थित होते. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे, श्रीमती चौरे यांनीही मार्गदर्शन केले.

आपले गाव आदर्श करा ः गाडेकर
उद्धवराव गाडेकर यांनी ग्रामगीतेचे महत्त्व सांगून आपले गाव स्वच्छ, हगणदारीमुक्त, व्यसनमुक्त करुन एक आदर्श गाव करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या विदयार्थ्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन व स्वच्छता या विषयावर सुंदर नाटीका सादर केली. शाहीर मधुकर नावकर यांनी लोकप्रबोधनपर गीते सादर केली. सायकल रॅलीत सहभागी झालेले सायकल मित्र परिवाराचे गजाजन खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ऑक्टोबर महिन्यात अकोला शहर करणार
येत्या ऑक्टोबर महिन्यात भारत स्वच्छ मिशन अंतर्गत संपूर्ण अकोला शहर स्वच्छ करण्याचा संकल्प यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला. महानगर पालिकाचे अधिकारी, कर्मचारी, अन्य अधिकाऱ्यांसह नागरिक या मोहिमेत सहभागी होऊन शहरातील एकूण एक भाग स्वच्छ करणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: akola news The District Collector issued a ride on cleanliness