ई-रिक्षा चालवून ‘अजय’ करतोय कायद्याचा अभ्यास

अनुर ताले
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

स्थानिक जतवननगर येथे राहणारा अजय सुखदेव जोगदंड याला एक मोठा भाऊ व बहीण आहे. आई-वडिलांनी दिवसरात्र कष्ट उपसित कसेबसे बहिणीचे लग्न करून दिले. पोटाला चिमटा देत दोन्ही मुलांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, त्यापुढे मुलांना शिकवण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. अशा स्थितीत, स्वतःचे ध्येय व कुटुंबाच्या संघर्षात हातभार लावण्यासाठी अजयने पुढाकार घेतला.

अकोला : परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकविते. घरचे अठाविश्‍व दारिद्र्य असताना केवळ इच्छा शक्तीच्या बळावर दिवसरात्र काबाडकष्ट करून कायदाचा अभ्यास करणाऱ्या अजयलाही परिस्थितीने लढण्याचे बळ दिले. त्यामुळेच तो आज सायकल रिक्षा चालविणारे वडील अन् दोन पैशासाठी लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या आईला समाजात सन्माने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी झटतोय. 

स्थानिक जतवननगर येथे राहणारा अजय सुखदेव जोगदंड याला एक मोठा भाऊ व बहीण आहे. आई-वडिलांनी दिवसरात्र कष्ट उपसित कसेबसे बहिणीचे लग्न करून दिले. पोटाला चिमटा देत दोन्ही मुलांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, त्यापुढे मुलांना शिकवण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. अशा स्थितीत, स्वतःचे ध्येय व कुटुंबाच्या संघर्षात हातभार लावण्यासाठी अजयने पुढाकार घेतला. कोणत्याही परिस्थित कुटुंबाला या दारिद्र्यातून बाहेर काढायचे. त्यासाठी त्याने निश्चय केला, आपण वकिल बनायचे आणि कुटुंबाला समजात मानसन्मान अन् आर्थिक मजबुती मिळवून द्यायची. परंतु, केवळ इच्छेच्या जोरावर ते कसे करणार! यासाठी त्याने शक्कल लढवली, कोणतेही इंधनाशिवाय चालणाऱ्या ई-रिक्षा चालविण्याची. त्यासाठी त्याने अकोल्यातील एका रिक्षा विक्रेत्या एजन्सिकडे जाऊन परिस्थिती व निश्चय व्यक्त करून दाखविला.

तारूण्यात मुले आई-वडिलांच्या पैशावर मजा करतात, नकोत्या गोष्टीत पैशाचा चुराडा करतात अाणि हा युवक आई-वडिलांच्या घामचे चिझ करण्यासाठी धडपडतोय, हे पाहून त्या एजन्सीच्या मालकांनी, कोणत्याही फायनान्स किंवा धनादेशाशिवाय केवळ २० हजार रुपये घेऊन एक लाख ४० हजार रुपयांचा रिक्षा नावे करून दिला. आज अकोल्यात रोज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ई-रिक्षा चालवून अजय परिवाराला आर्थिक हातभार लावत आहे. रात्र जागवून कायद्याचा अभ्यासही करीत आहे. त्याचा हा संघर्ष आजचा नसून, यापूर्वी त्याने मेडिकल स्टोअर्स’मध्ये चारवर्षे व आॅप्टिकलस् मध्ये साडेचार वर्षे पार्टटाईम काम करून स्वतःचे शिक्षण व कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. बिए पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने येथील नथमल गोयनका लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दिवसा काम अन् रात्री अभ्यास अशा परिश्रमाने अजयने लॉ पदवीचे तीसरे वर्ष गाठले आहे. पंधरादिवसांपासून तो ई-रिक्षा चालवत असून, मिळत असलेल्या पैशातून लवकर वकील बनणार असल्याचा विश्वास त्याने सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Akola news e rickshaw ajay jogdand