शेंगा नसल्याने शेतकऱ्यांनी काढली सोयाबीनची प्रेतयात्रा

Akola
Akola

बाळापूर (अकोला) : सोयाबीन पिकाला शेंगाच नसल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी वाडगांव येथे सोयाबीनची झाडे आणून तिरडीवर ठेऊन चक्क प्रेतयात्रा काढली.या प्रेतयात्रेकडे शासनाचे  लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अक्षरशः जोरजोरात रडून आक्रोश केला.

बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाडेगावात या प्रेतयात्रेचे आयोजन केले होते.येथील बेसिक शाळेच्या पटांगणातून या यात्रेला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. तालुक्यात या वर्षी पावसाचा अभाव व  वातावरणातील बदलामुळे हजारो हेक्टर वरील सोयाबीन पिकावर रोगराई पसरली आहे. परीणामी सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यावर खुप मोठे संकट ओढवले आहे.

चक्री भुंगा आणि विविध प्रकारच्या आळ्यामुळेही सोयाबीन धोक्यात सापडले आहे. उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालूक्यात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. प्रेतयात्रेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी "सोयाबीन खल्लास, शेतकरी खल्लास"  "सोया, तुला आमच्यावर भरोसा नव्हता का" अशा घोषणा दिल्या.

यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता. परीसरातील नुकसान ग्रस्त हजारो शेतकरी प्रेतयाञेमध्ये सहभागी झाले.शासनाकडून तसेच विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी या निमित्य शेतकऱ्यांनी केली. बेसिक शाळेच्या मैदानवरुन निघून तिथेच दहन करण्यात आले. दरम्यान संपूर्ण गावातून प्रेतयात्रा याञा कढण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com