गांधीग्राम पुरी एक्सप्रेस मधून धूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

प्रवाशांच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली 

अकोला : येथून 6.15 pm ला निघालेल्या गांधीग्राम-पुरी गाडीतून (नंबर 19453) 7 pm ला अचानक धूर निघाला. धूर एसी कोचमधून निघत असल्याचे जनरलमधील प्रवाशांच्या लक्षात आले. यात बहुसंख्य प्रवासी अकोला-अमरावती अपडाऊन करणारे होते. त्यांनी आग आग असा गलका केला. महिला, मुले ओरडू लागली. कुणीतरी इमरजन्सी चेन ओढली.

मिनिटभरात गाडी थांबली. लोकांनी पटापट उड्या घेतल्या. धूर आटोक्यात आणण्यात आला. अद्याप गाडी थांबलेली आहे. बडनेरा येथून 20 किमी असल्याचे प्रवाशांनी सांगितले. एसीचे वायर जळाले, ब्रेक शूज जळाले आदी चर्चा सुरू आहे.. नेमके कारण समजण्यास मार्ग नाही.

Web Title: akola news gangadham puri express railway ac smoke