जाळलेल्या कचऱ्यापासून राहा सावध !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

अकोलाः शहरातील वाढत्या प्रदुषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. शिवाय, जाळलेल्या कचऱ्यामुळे हिवाळ्यात आणखी घातक परिणाम समोर येत असून, श्वसन, फुप्फुसांच्या आजारांसह वारंवार सर्दी, शिंका येणे, खोकला येणे, कफ वाढणे या सारख्या आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यापासून बचावासाठी वाहनांच्या धुरासह जाळलेल्या कचऱ्यापासून सावध राहा, असे आवाहन फुप्फुस व श्वसन नलिका तज्ज्ञ व दुर्बिन परीक्षक डॉ. अनिरूद्ध भांबुरकर यांनी केले.

जागतिक सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टीव्ह पल्मोनरी डिसीज) दिनानिमित्त बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाढती धुळ, जाळलेल्या कचऱ्याचा धुर, वाढते प्लास्टीक व रासायनिक वस्तूंचे प्रमाण, वाहतुकीचे व इतर प्रदुषणामुळे दिवसेंदिवस दमा व श्वसन विकार, फुप्फुस विकारांमध्ये तिपटीने वाढ हाेत आहे. त्यामुळे नागरिकांना सर्दी, शिंका, खोकला येणे, कफ वाढणे श्वासोश्वासाचे विकार जाणवू लागले आहे. प्रदुषणामुळे श्वसन नलिकेत मोठ्या प्रमाणात ताठरपणा व बदलाव येतो. श्वसन नलिकेच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. देशात दरवर्षा १५ ते २० दशलक्ष रुग्ण आढळून येतात. त्यापैकी ६५ टक्के रुग्ण पुरूष, तर ३५ टक्के रुग्ण महिला आहेत. जुना खोकला, कफ पडणे, श्वसनाचा त्रास, छाती खरखर करणे, फुप्फुस सकस होणे, कोरढी ढास लागणाऱ्या रुग्णांना हा आजार होऊ शकतो. जागतिक स्वास्थ संघटनेनुसार, शहरीभागातील सल्फेट नायट्रेट्स, कार्बन मोनोऑक्साईड, ब्लॅक कार्बन, धुळीचे कण व २.५ मायक्रॉन साईजचे कण श्वसन नलिकेमध्ये शिरकाव करून त्याला ईजा पोहचवितात. परिणामी श्वसन नलीका लालसर होणे, कफच्या घाणींद्र्या वाढणे, श्वसन नलीका संवेदनशिल होणे व शेवटी श्वसन नलिका अरूंद व सकस होते. यालाच सीओपीडी असे म्हणतात.

संतुलित आहार व नियमित व्यायाम
प्रदुषण नियंत्रणासोबतच आंबट व थेड पदार्थ टाळणे आवश्यक आहे. शिवाय, संतुलित आहार आणि नियमीत व्यायाम केल्यास निरोगी आरोग्य राखण्यास मदत होते. त्यामुळे नियमीत व्यायम करून संतुलित आहार घेण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: akola news health care Dr. Aniruddha Bhamburkar