उन्नत भारताचे स्वप्न हे उन्नत गावां शिवाय शक्य नाहीः डॉ. भटकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

अकोला: देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविदयालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.

अकोला: देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविदयालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती पांडुरंग फुडंकर, माजी मुख्य सचिव (कृषी) उमेशचंद्र सारंगी तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरु डॉ.विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना डॉ. विजय भटकर म्हणाले की, भारतात कृषि-ऋषी संस्कृती असून जगातील सर्वात जुने ज्ञानावर आधारीत कृषी संस्कृती आहे. जगातील पहिले विश्वविदयालय नालंदा विश्वविदयालय होते. त्यामुळे वैदिक काळात भारताला वैभव प्राप्त होते. परंतू, कालांतराने यामध्ये बदल झाला आहे. भारतातला उन्नत राष्ट्र बनवून प्रत्येक महाविदयालयाने ग्रामपंचायती दत्तक घेवून त्याठिकाणी प्रयोग संशोधन व आणि नविन उपक्रमासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे गावाची उन्नती होईल. उन्नत भारताच्या उद्दिष्टासाठी भारतातील प्रमुख शैक्षणिक संशोधन संस्था यांनी ज्ञानांची शक्ती वाढवून त्याशक्तीचा उपयोग गावामध्ये नविन तंत्रज्ञान, पध्दती आणि धोरणाचा वापर करून गावाच्या शाश्वत विकासाला चालना देणे आवश्यक आहे. डॉ. भटकर पुढे म्हणाले की, या विद्यापीठातील विदयार्थ्यांनी पदवीप्राप्त झाल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग गाव उन्नत करण्यासाठी करावा म्हणजे भारत १५ ऑगस्ट २०४७ साली  स्वतंत्रता शताब्दी वर्ष साजरे करतांना देशातील प्रत्येक गाव उन्नत होईल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या पदवीदान समारंभात २६३२ पदवीधरांना पदवीदान करण्यात आले. यात बी.एस.सी. कृषीचे १७७३, बी.एस.सी.उद्यानविद्या १२३, बी.एस.सी.कृषी जैवतंत्रज्ञान १०७, बी.टेक कृषी अभियांत्रिकी १२७, एम.एस.सी.कृषी २३८, आणि पी.एच.डी.च्या ४१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण करण्यात आले.

उत्कृष्ट शिक्षक म्हणुन डॉ. नारायण मुरलीधर काळे यांना रजत पदक देवुन सन्नमानीत केले. यावेळेस डॉ. बी.ए. सोनुने, डॉ. व्ही. के खर्चे, डॉ. व्ही.व्ही.गभणे, डॉ. एन.एम. कोंडे, डॉ. आर. एन. काटकर यांना उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल तसेच संशोधन कार्यासाठी व विदयापीठ क्षेत्रातील शेतकऱ्यांना तात्काळ पोचविण्यासाठी डॉ. पी. के नागरे, डॉ. डी. एच. पैठणकर, डॉ. एकता बागडे, डॉ. व्ही. व्ही. सोनाळकर व डॉ. एके सदावर्ते यांना रोख पारितोषीक देवून सन्मानीत करण्यात आले. तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल डॉ. गुरमित सींग बुट्टर यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून संजयकुमार किसनराव कुसटकर यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य माजी कुलगुरु, प्राचार्य, प्राद्यापक, संशोधक, विभाग प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: akola news india village dr vijay bhatkar