अकोल्यातील जव्वादला आंतरराष्ट्रीय संशोधनाचा मान 

विवेक मेतकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

अकोला - "एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लाइफ' असे म्हणणारा अकोल्यातील सर्वसाधारण कुटुंबातील युवक जव्वाद पटेल. त्याने सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित, त्याचबरोबर प्रकृतीचा समतोल साधत एक-दोन नव्हेत, तर आपल्या शोध आणि संशोधनाची एक मालिकाच सुरू केली. जव्वादने दुचाकीस्वारांसाठी "स्मार्ट हेल्मेट' आणि "हवेपासून पाणी' ही दोन महत्त्वाची पेटंट आपल्या नावावर केली आहेत. 

मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात प्रारंभिक शिक्षण घेणारा जव्वाद आपल्या अभ्यासात जेमतेमच होता; परंतु त्याच्याकडे चिकित्सकता होती. हैदराबाद येथे बीटेकपर्यंत शिक्षण घेणाऱ्या जव्वादने "टेड टॉक'पासून सुरवात करत जवळपास दोन हजार संशोधने सादर केली. दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची पेटंटसुद्धा मिळवली. पाणी, ऊर्जा, आरोग्य विज्ञान आणि कृषी या चार क्षेत्रांत त्याने केलेले संशोधन विशाल आहे. यासह त्याचे 39 आंतरराष्ट्रीय शोधप्रबंध पन्नासहून अधिक देशांत प्रसिद्धी मिळवत आहेत. 

ही आहेत संशोधने हवेपासून पाणी 
वातावरणामध्ये असणाऱ्या ओलाव्यापासून पाणी बनविण्याकरिता "ड्यू-ड्रॉप' नावाचे 800 ग्रॅमच्या उपकरणाद्वारे एका तासात दोन लिटर पाणी बनविता येते. हे उपकरण त्याने प्रायोगिक तत्त्वावर भारतीय सैन्याला भेट म्हणून अरुणाचल प्रदेश येथे पाठविले असल्याचे त्याने सांगितले. 

स्मार्ट हेल्मेट 
जव्वादने विकसित केलेले स्मार्ट हेल्मेट धूम्रपान, मद्यपान, ट्रिपल सिट, दुचाकी चालविताना फोनचा वापर होत असल्यास इग्निशन अलर्ट देते. दुचाकीस्वारास अपघात झाल्यास त्याची सूचना स्वकियांना देते. या हेल्मेटमध्ये जीपीएस प्रणाली, सोलर पॉवर, ब्लू-टुथ कनेक्‍टिव्हिटी आहे. 

ब्रेस्ट कॅन्सरवर तंत्रज्ञान 
ब्रेस्ट कॅन्सर तत्काळ ओळखण्यासाठी जव्वादने "एपिडर्मस तंत्रज्ञान' शोधले. हे उपकरण लहान बोटीच्या आकाराचे असून, आजाराची सूचना देते. प्राथमिक स्तरावरील स्तनाच्या कर्करोगाचे निदान होत असल्याचा त्याचा दावा आहे. या उपकरणामुळे अतिशय सोपी आणि वेदनारहित स्कॅनिंग होते.

Web Title: akola news Javvad Patel