अकोला: स्वातंत्र्यदिनी जवानावर अंत्यसंस्कार

अनिल दंदी
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

खमंग (तेलंगणा) येथे कामावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन या बाबत बेदखल असून जिल्हा प्रशासनाचा एकही अधीकारी त्यांच्या अंत्यसंस्कार करता वेळी हजर नव्हते. जवानाविषयी किती आदर आहे, याचा प्रत्यय धानोरा वासियांना आला.

बाळापूर (अकोला) : शहीद सुमेध गवई यांच्या चितेची दाहकता प्रतेकाच्या मनात धगधगत असतानाच आज बाळापूर तालुक्यातील धानोरा गावातील कैलास सुर्यभान इंगळे (C.I.S.F) या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

खमंग (तेलंगणा) येथे कामावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन या बाबत बेदखल असून जिल्हा प्रशासनाचा एकही अधीकारी त्यांच्या अंत्यसंस्कार करता वेळी हजर नव्हते. जवानाविषयी किती आदर आहे, याचा प्रत्यय धानोरा वासियांना आला.

कैलास इंगळे हे हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाची माहीती जिल्हा प्रशासनाला नसली तरी, बाळापूर उपविभागीय अधीकारी प्रा. संजय खडसे, बाळापूर आमदार बळीराम सिरस्कार यांना माहीती मिळताच ते धानोरा येथे उपस्थित झाले. सीआयएसएफचे जवान त्यांचे पार्थिव घेऊन आज सकाळी धानोरा येथे दाखल झाले. स्वातंत्र्यदिनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. हृदयविकाराने जरी त्यांचा मृत्यू झाला असला तरी ते कर्तव्य बजावत होते. तरी त्यांच्या पार्थिवाला खांदा देते वेळी प्रशासन असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Web Title: Akola news jawan cramation in akola