खामगावात लाखोंचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

खामगाव - खामगाव शहराजवळील वाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या गोदामावर शहर पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा 60 टन गहू व तांदूळ आणि 1510 लिटर रॉकेलचा साठा जप्त करत गोदाम सील केले. राज्यासह परराज्यांत रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

वाडी येथे स्वस्त धान्य दुकानदार जयकुमार शाळीग्राम चांडकचे दोन एकर जमिनीवर विविध खोल्या असलेले गोदाम आहे. या गोदामामध्ये रेशनचे धान्य अवैधपणे साठवून काळ्या बाजारात त्याची विक्री केली जात असल्याची माहिती खामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांना मिळाली. त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी रात्री दोन पोलिस कर्मचारी या गोदामाच्या परिसरात पाळतीसाठी ठेवले. तेव्हा गोदामात धान्य व रॉकेलचा अवैध साठा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सकाळी गोदामावर छापा टाकला. या वेळी तहसीलदार सुनील पाटील यांनाही पाचारण करण्यात आले. गोदाम परिसराची दिवसभर तपासणी करण्यात केल्यानंतर पोलिसांना विविध खोल्यांमध्ये सुमारे 60 टन गहू, तांदूळ आणि 1510 लिटर रॉकेलचा अवैध साठा आढळला. 

Web Title: akola news khamgaon wheat rice