लाचखोर तालुका कृषी अधिकारी रंगेहात पकडला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

अकोला - जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके काढण्यासाठी लाच मागणाऱ्या अकोट तालुका कृषी अधिकाऱ्याला शनिवारी (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. 

अकोला - जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके काढण्यासाठी लाच मागणाऱ्या अकोट तालुका कृषी अधिकाऱ्याला शनिवारी (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. 

तक्रारकर्त्याने केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे याने एक लाख ६० हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी एक लाख रुपयांचा धनादेश आधीच स्वीकारला असून शनिवारी ६० हजार रुपये नगदी देण्याची मागणी केली होती. मात्र यासंदर्भात तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी (ता. १६) पडताळणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अकोट येथील कृषी कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ठाकरे याला ताब्यात घेतले. यामध्ये आणखी काही जणांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संजय गोरले यांच्या पथकाने केली. ठाकरे हा तीनच वर्षांपूर्वी कृषी विभागात रुजू झाला असून परिविक्षा कालावधीसुद्धा अद्याप संपलेला नाही. त्यापूर्वीच त्याच्याविरुद्ध ही कारवाई झाली. 

Web Title: akola news krushi officer bribe crime vidarbha