राष्ट्रवादीने या नेत्याला आमदार करून भाजपसह वंचित बहूजन आघाडीला दिली टक्कर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

या बदलानमुळे राष्ट्रवादीने एकाच दगडात दोन पक्षी मारले.  बहुजन समाजातील चेहरा असलेल्या मिटकरी यांची आमदारपदी वर्णी लावत राष्ट्रवादी कॉँग्रेसने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ‘सोशल इंजिनिअरींग’च्या माध्यमातूनच टक्कर दिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

अकोला : अकोट तालुक्यातील कुटासा या छोट्याशा गावातील शेतकरी पुत्र अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शपथ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील नेते राजकीय दृष्ट्या एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त असतानाच मिटकरी यांच्या रुपाने तरूणाईने थेट विधान परिषदेत धडक दिली.

या बदलानमुळे राष्ट्रवादीने एकाच दगडात दोन पक्षी मारले.  बहुजन समाजातील चेहरा असलेल्या मिटकरी यांची आमदारपदी वर्णी लावत राष्ट्रवादी कॉँग्रेसने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ‘सोशल इंजिनिअरींग’च्या माध्यमातूनच टक्कर दिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 


शिक्षक आमदार बैठकीपुरतेच
अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासह विधान परिषदेचे तीन आमदार असे एकूण आठ आमदार जिल्ह्याला मिळाले आहेत. य़ाशिवाय शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे हेहीसुद्धा अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. मात्र त्यांचे निवास स्थान अमरावती जिल्ह्यात असून, मतदारसंघ हा अमरावती विभाग असल्याने अकोल्यातील त्यांचा संपर्क केवळ बैठकांपुरताच मर्यादित असतो. 

 

Image may contain: 4 people, glasses and close-up
जिल्ह्यात भाजपचे चार आमदार
जिल्ह्यात भाजपचे चार विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर, अकोला पश्चिममधून सहाव्यांदा निवडून आलेले गोवर्धन शर्मा, तिसऱ्यांना निवडून आलेले मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे आणि अकोटमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले प्रकाश भारसाकळे हे चार आमदार भाजपचे आहेत.

 

Image may contain: 2 people, glasses and beard
शिवसेनेचे दोन आमदार
शिवसेनेने बाळापूरमध्ये नितीन देशमुख यांच्या रुपाने दहा वर्षांनंतर जिल्ह्यात खाते उघडले होते. विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि विभागीय पदविधर मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारे भाजपचे डॉ. रणजित पाटील हेसुद्धा अकोला जिल्ह्यातील निवासी आमदार आहेत.

 

Image may contain: 1 person, glasses and close-up
काँग्रेस आणि वंचितची पाटी मात्र कोरीच
आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी या जिल्ह्यात कोरी होती. त्यात यावेळी भारिप-बमसं अर्थात वंचित बहुजन आघाडीचीही भर पडली होती. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने अकोटचे युवा नेते अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली. ते जिल्ह्यातील आठवे आमदार ठरले आहेत. त्यामुळे विधिमंडळात अकोल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाले. काँग्रेस आणि वंचितची पाटी मात्र कोरीच राहिली. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news by making amol mitkari leader an MLA, the NCP clashed with the BJP and the Vanchit Bahujan Aghadi