अकोल्याचा मकरंद करतोय जपानमध्ये भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व 

अनुप ताले
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मकरंद एमसीव्हीसीचा विद्यार्थी 
सायन्सच्या विद्यार्थांना उच्च हद्द्यावर तसेच परदेशात काम करण्याची संधी मिळते, असा समज अनेकांचा आहे. परंतु, अकोल्यामध्ये एमसीव्हीसी माध्यमातून मकरंदने बारावी उत्तीर्ण करून अमरावती येथे अभियांत्रिकेचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तो आज भारतीय मालवाहू रेल्वेसाठी जपानमध्ये काम करीत असल्याने, शिक्षणाच्या माध्यमापेक्षा कौशल्य, आत्मविश्वास व कामातील एकनिष्ठेवर यश निर्भर करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

अकोला : देशातील उद्योग वृद्धींगत व्हावा याकरिता चतुक्षकोणातील मार्गांना मालवाहू ट्रेनद्वारे जोडण्याचे काम केंद्राद्वारे सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि. द्वारे जोडला जाणारा दिल्ली (रेवाळी) वडोदरा मार्गावरील इलेक्ट्रिकल्स आणि मेकॅनिकलचे काम अकोल्याचे मकरंद भाकरे यांचेकडे सोपविण्यात आले. त्याकरिता लागणारे पार्ट खरेदीकरण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याकरिता त्यांना जपान येथे १० दिवसीय दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे. 

केंद्र सरकारच्या उपक्रमानुसार देशातील मोठ्या शहरांना जसेकी दिल्ली ते कोलकत्ता, दिल्ली ते मुंबई, मुंबई ते मद्रास, मद्रास ते कोलकत्ता या व त्यामार्गे येणाऱ्या शहरांना रेल्वे मार्गांनी जोडून मालवाहू रेल्वेद्वारे उद्योगवृद्धीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार पहिल्या फेजमध्ये दिल्ली ते वडोदरा या ९५० कि.मी. मालवाहू रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत दिल्ली (रेवाळी) ते वडोदरा मार्गावरील इलेक्ट्रिकल्स बाबतची जबाबदारी वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि.च्या प्रोजेक्टनुसार रेवाळी येथे कार्यरत अकोल्याचे मकरंद भाकरे यांचेकडे दिलेली आहे. त्यामुळे या मार्गावरील पोजेक्टकरिता लागणारे इलेक्ट्रिकल्स व मेकॅनिकल्स उपकरणांची खरेदी करण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याची जबाबदारीसुद्धा त्यांचेवर सोपवून जपान येथे १० दिवसीय दौऱ्यावर त्यांना रेल्वेकडून पाठविण्यात आले आहे. मकरंद डाबकीरोड येथील मध्यमवर्गीय प्रकाश भाकरे व सुरेखा भाकरे यांचा मुलगा आहे. इयत्ता दहावीनंतर त्याने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. बारावीत अमरावती बोर्डातून गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला होता. सन २०१४ मध्ये मकरंदला डीएफसीसीआयएल अंतर्गत प्रोजेक्टवर नियुक्त करण्यात आले. त्यांच्या चिकाटी व प्रामाणिक कामातून त्याला पीएसआय म्हणून बढती मिळाली व २२ आॅगस्ट रोजी त्यांना जपान येथे पाठविण्यात आले आहे. 

मकरंद एमसीव्हीसीचा विद्यार्थी 
सायन्सच्या विद्यार्थांना उच्च हद्द्यावर तसेच परदेशात काम करण्याची संधी मिळते, असा समज अनेकांचा आहे. परंतु, अकोल्यामध्ये एमसीव्हीसी माध्यमातून मकरंदने बारावी उत्तीर्ण करून अमरावती येथे अभियांत्रिकेचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तो आज भारतीय मालवाहू रेल्वेसाठी जपानमध्ये काम करीत असल्याने, शिक्षणाच्या माध्यमापेक्षा कौशल्य, आत्मविश्वास व कामातील एकनिष्ठेवर यश निर्भर करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title: Akola news Makrand Bhakre in japan