रेल्वे स्थानकावर लवकरच मिळणार वाय-फाय सुविधा

सुगत खाडे
गुरुवार, 6 जुलै 2017

मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील महिनाभराच्या आत वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ विभागीय रेल्वे समितीचे अध्यक्ष व जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिली.

अकोला - मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील महिनाभराच्या आत वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ विभागीय रेल्वे समितीचे अध्यक्ष व जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिली.

रेल्वे आयोजित पत्रकार परिषदेत धोत्रे बोलत होते. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का शिवणी-शिवापूर रेल्वे स्टेशनवर स्थानांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी रेल्वे प्रशासन सुद्धा तयार आहे. परंतु काही लोकांच्या विरोधामुळे मालधक्का स्थानांतरित करण्यासाठी उशीर होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. ती सोडवण्यासाठी प्रशासनाने रेल्वेच्या मालकीची खुली जागा वापरने सोयीचे होईल. भुसावळ व नागपूर रेल्वे मंडळाच्या कार्यालयांवर कामाचा व रेल्वे वाहतुकीचा अधिक व्याप असल्यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या स्थानिक रेल्वे स्टेशनवरून जाण्यास अद्याप अनुकूलता नाही. परंतु त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे विस्तारीकरणाच्या योजना या बांधकाम व वन विभागाशी संबंधित असल्यामुळे पूर्ण होण्यात वेळ लागतात. असे सांगुण त्यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर रेल्वे स्टेशनवर काही सुविधा सुरू करण्यासंबंधी विचार करण्यात येत असल्याची माहिती दिली. भारतीय रेल्वे आणि गुगल सोबतच्या उपक्रमांतर्गत रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुविधा देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदमध्ये आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, चेंबरचे विजय पनपालिया उपस्थित होते.

रेल्वे स्टेशनची पाहणी
जनता दरबारानिमित्त गुरुवारी (ता. 6) रेल्वे स्टेशनवर आलेल्या खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली. स्टेशन परिसरात बनवण्यात येणाऱ्या लिफ्टच्या कामकाजाचा आढावा घेतला. शिवाय, रेल्वे तिकीट आरक्षणच्या खिडक्‍यांना भेट देवून प्रवाशांसी संवाद साधला. रेल्वेच्या नव्या प्रस्तावित दादऱ्याच्या जागेची पाहणी करून रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दादऱ्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्याच्या सोबत आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, चेंबरचे विजय पनपालिया, स्टेशन मास्टर मीणा, आरपीएसचे पोलिस निरीक्षक राजेश बढे व रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: akola news marathi news sakal news wi fi service