मोर्णा स्वच्छता अभियानाची दखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

अकोला - मोर्णा नदी स्वच्छतेसाठी अकोलेकरांनी घेतलेल्या पुढाकाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन २०१८ या वर्षातील पहिल्याच ‘मन की बात’मध्ये त्यांनी या लोकचळवळीचे काैतुक केले.  मोर्णा नदी जलकुंभीमुळे प्रदूषित झाली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेत मोर्णा नदी स्वच्छतेला लोकचवळीचे स्वरूप दिले. दर शनिवारी मोर्णा नदीच्या काठावर अकोलेकरांनी एकत्र येऊन विषवाहिनीला गतवैभव मिळून देण्यासाठी योगदान दिले. त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मध्ये केला. 

‘सकाळ’चा पुढाकार
मोर्णा नदी संवर्धनाची संकल्पना सर्वप्रथम ‘सकाळ’ने मांडली. त्यासाठी कार्यक्रम हाती घेतला. मोर्णा नदीच्या काठावर स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. मोर्णा नदीच्या काठावर विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमही ‘सकाळ’च्या वतीने घेण्यात आले. ‘सकाळ’ची संकल्पना जिल्हा प्रशासनाने भरभक्कमपणे राबविली.

Web Title: akola news Morna river Cleanliness campaign narendra modi mann ki baat