अकोला: सासूचा खून करुन जावई फरार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

श्वान पथक दाखल 
खूनाचा तपास करण्यासाठी महान येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले हाेते. यावेळी बार्शीटाकळी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सतिश पाटील, पीएसआय साेनाेने, चव्हाण व पाेलिस उपस्थित हाेते.

अकोला : महान येथील वॉर्ड क्रमांक दाेनमधील बिहाडमाथा येथे प्रमिला भगवान आठवले यांचा मुन्नेश निमकांडे या त्यांच्याच जावयाने सासूचा खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस झाली.

बिहाडमाथा येथील विधवा महिला प्रमिला भगवान आठवले (वय ४५) यांची मुलगी दिपाली हिचे लग्न आगरा येथील मुन्नेश निमकांडे (वय ३५) याच्या सोबत झाले हाेते. दिपाली हिला दोन मुली आहेत. 

आरोपी मुन्नेश निमकांडे व दिपाली यांचे काही वर्षांपासून पटत नव्हते. मुन्नेश ह्याला दारुचे व्यसन असून तो पत्नीला नेहमी मानसिक व शाररिक त्रास द्यायचा. यामुळे दिपाली गेल्‍या दोन ते तिन वर्षांपासुन दोन्ही मुलीला घेऊन आगरा येथून माहेरी महान येथे राहात होती. आईच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने ती शेतात मजुरी करुन दोन्ही मुलींचे पालन पोषण करायची. आरोपी मुन्नेश हा वर्षांतून दोन ते तीन वेळा महान येथे भेटीसाठी यायचा. येथे आल्यावर सुध्दा तो सासू व पत्नीला अतोनात त्रास द्यायचा. 

मागील चार दिवसांपूर्वी आरोपी मुन्नेश हा महान येथे आला होता. गुरुवारी (ता.१२) रात्री दारु पिऊन तो पत्नीसाेबत वाद घालत हाेता, त्यामुळे दिपाली शेजारी गेली असता मुन्नेशसुद्धा घराबाहेर पडला. घरातकेवळ दिपालीची आई प्रमिला आठवले ही झोपलेली होती. रात्री मुन्नेश बाहेरुन आला. त्याने पत्नीवरील रागातून सासू प्रमिला आठवले हिच्या तोंडावर नाकावर लाथा, बुक्यांनी वार केले. मृतक प्रमिलाच्या नाका तोंडातुन रक्ताचा सडा वाहत असल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुन्नेश हा तेथून मध्यरात्रीच पसार झाला. रात्री पाऊस सुरु असल्याने मृतक प्रमिलाच्या आेरडण्याचा आवाज बाहेर आला नाही. सकाळी दिपाली घरात गेली असता, तिला आईच्या तोंडावर साडीचे पदर झाकलेला दिसला. पदर काढला असता चेहरा रक्ताने भिजलेला दिसला. तो पर्यंत प्रमिला आठवले यांची प्राणज्योत मावळली होती. बार्शीटाकळी पाेलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता सर्वाेपचार रूग्णालयात पाठविले. मुन्नेश निमकांडे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पाेलिस आराेपीचा शाेध घेत आहेत. 

श्वान पथक दाखल 
खूनाचा तपास करण्यासाठी महान येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले हाेते. यावेळी बार्शीटाकळी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सतिश पाटील, पीएसआय साेनाेने, चव्हाण व पाेलिस उपस्थित हाेते.

Web Title: Akola news murder case