'कुशल अकोला’ माेहिमेसाठी उद्याेजकांना प्रशासनाचे सहकार्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

अकोला जिल्ह्यात उद्याेग वाढीसाठी पाेषक वातावरण आहे. त्यानुषंगाने उद्याेजकांना हवे असणारे प्रशिक्षत कुशल मनुष्यबळ उपलब्ध हाेण्याकरिता आणि बेराेजगार युवकांना राेजगार उपलब्ध हाेण्यासाठी प्रशासनाकडून निश्चितपणे सहकार्य केले जाईल. तरूणांना काैशल्य विकासाद्वारे कुशल आणि सक्षम करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्याेग सेवा व तत्सम क्षेत्रात राेजगार, स्वयंराेजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमाेद महाजन काैशल्य व उद्याेजकता विकास अभियान सुरू करण्यात आले आहे.

अकोला : उद्याेग वाढीसाठी उद्याेजकांना कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असते, असे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाच्या विविध याेजनांच्या माध्यमातून उद्याेजकांनी बेराेजगार युवकांना काैशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यास पुढाकार घेतला तर प्रशासनाच्या वतीने उद्याेजकांना प्राधान्याने सहकार्य केले जाईल व हे कुशल मनुष्यबळ उद्याेजकांसाठीच उपलब्ध असेल, यासाठी उद्याेजकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.

जिल्हा काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता मार्गदर्शन केंद्राच्या अभिनव संकल्पनेतून बेराेजगार युवकांसाठी खासगी क्षेत्रात राेजगार, स्वयंराेजगाराच्या संधीची उपलब्धता याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता. ३) जिल्हाधिकारी यांचे दालनात उद्याेजक, व्यावसायिकांना आमंत्रित करण्यात आले हाेते. यावेळी जिल्हाधिकारी बाेलत हाेते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, मनपा आयुक्त अजय लहाने, जिल्हा काैशल्य विकास राेजगार व उद्याेजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक द.ल. ठाकरे यावेळी उपस्थित हाेते.

अकाेला जिल्ह्यात उद्याेग वाढीसाठी पाेषक वातावरण आहे. त्यानुषंगाने उद्याेजकांना हवे असणारे प्रशिक्षत कुशल मनुष्यबळ उपलब्ध हाेण्याकरिता आणि बेराेजगार युवकांना राेजगार उपलब्ध हाेण्यासाठी प्रशासनाकडून निश्चितपणे सहकार्य केले जाईल. तरूणांना काैशल्य विकासाद्वारे कुशल आणि सक्षम करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्याेग सेवा व तत्सम क्षेत्रात राेजगार, स्वयंराेजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमाेद महाजन काैशल्य व उद्याेजकता विकास अभियान सुरू करण्यात आले आहे. उद्याेजकांनी त्यांच्याकडील साधनसामग्री वापरून प्रशिक्षण संस्था म्हणून नाेंद करून कुशल मनुष्यबळ निर्माण करावे व आपल्या तसेच इतर संबंधित आस्थापनांवर नियुक्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी शासनाने ‘आयएलएसडीपी’ हा उद्याेग केंद्रीत काैशल्य विकास कार्यक्रम सुरु केलेला आहे. जिल्हास्तरावर या याेजनेची अंमलबजावणी सहायक संचालक, जिल्हा काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता मार्गदर्शन केंद्र अकाेला यांच्यामार्फत करण्यात येते. उद्याेजकांच्या अडचणीही प्राधान्याने साेडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

सभेच्या प्रारंभ द. ल. ठाकरे यांनी जिल्ह्यातील उद्याेजकांमार्फत काेणते अभ्यासक्रम राबवले जाऊ शकतात तसेच अभ्यासक्रम राबवण्याची आवश्यकता याबाबतचे सविस्तर सादरीकरण केले. उद्याेजकांच्या आस्थापनेवर प्रशिक्षित उमेदवारांचा दर्जा निश्चितच चांगला असेल तसेच उमेदवारांत व्यवसायिक, आदरातिथ्य, बांधकाम, जेम्स अँड ज्वेलरी, वैद्यकीय तसेच अपारंपारिक उर्जा क्षेत्रात राेजगार, स्वयंराेजगाराची संधी असल्याचे मत त्यांनी नाेंदविले. सभेला भारत एक कदम ग्रृपचे संस्थापक अरविंद देठे, विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पनपालिया, राेटरी क्लब आॅफ अकाेला अध्यक्ष संदिप दाेषी, खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडेलवाल, अजिंक्य फिटनेस पार्कचे धनंजय भगत, सावतराम पॉलिमर्सचे अध्यक्ष अलाेक गाेयनका, आरडीजी महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र व्यास व जिल्ह्यातील इतर नामांकित उद्याेग समुहाचे संचालकांची प्रामुख्याने उपस्थिती हाेती.

Web Title: Akola news traders training