भिमा कोरेगाव घटनेचे वऱ्हाडात पडसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

अकोला शहरात बाजारपेठ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांकडून जठारपेठ चाैकात हॉटेल व्यावसायिकाला मारहाणीचा प्रकार घडला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून युवकांना ताब्यात घेतले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. वाशीम शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद पाडण्यात आला

अकोला - वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांना जमावावर साैम्य लाठीमार करावा लागला.  

बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपासून भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली. यामध्ये खामगाव तालुक्यात पिंपरी गवळी, मलकापूर, देऊळगाव राजा, बुलडाणा येथे एसटी बसेसच्या काचा फोडल्या. शहरातील काही प्रतिष्ठाण तसेच रुग्णालयाचे नुकसान करण्यात आले, तर काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. बोरगाव मंजू येथेही रास्ता रोको करण्यात आला. अकोट- अंजनगाव मार्गावर बसवर दगडफेक करण्यात आली.

अकोला शहरात बाजारपेठ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांकडून जठारपेठ चाैकात हॉटेल व्यावसायिकाला मारहाणीचा प्रकार घडला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून युवकांना ताब्यात घेतले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. वाशीम शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद पाडण्यात आला.

Web Title: akola news: vidarbha agitation