अकोल्यात विजेची 45 कोटींची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

अकोला - जिल्ह्यात पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा 14व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागातर्फे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अकोला मंडलाअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण 990 जोडण्या असून, त्यांच्याकडे सुमारे 45 कोटी 69 लाख 9 हजारांची थकबाकी आहे. ग्रामविकास विभागातर्फे 28 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना "तत्काळ' असा शेरा असलेले पत्र देण्यात आले. या पत्रात थकबाकी भरणा करण्याची सूचना करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कधीही या पथदिव्यांच्या वीजपुरवठा खंडित करू शकते, अशी शक्‍यता वर्तवित असल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा 4 व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: akola news vidarbha news electricity bill 45 crore arrears