किन्नरांचे अकोल्यात आजपासून संमेलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

अकोला - किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन 1 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत अकोला शहरात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये किन्नरांचे विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे. त्यासाठी देशभरातील किन्नर अकोल्यात दाखल झाले आहेत.

संमेलनादरम्यान किन्नरांकडून शहरातून कलशयात्रा काढण्यात येणार आहे. देशात किन्नरांची संख्या सहा लाखांच्या जवळपास आहे. त्यांना सामाजिक जीवन जगताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शिक्षणाचा, रोजगाराचा अभावामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना त्यांचे हक्क मिळावे. या दृष्टिकोनातून सातत्याने किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येते.

Web Title: akola news vidarbha news eunuch sammelan