मंगळसूत्र विकून तिने घरात बांधले शौचालय

योगेश फरपट
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पार्वतीचा घ्यावा आदर्श
पार्वतीने पतीचा अपमान सहन न झाल्याने मंगळसूत्र मोडून घरी शौचालय बांधून घेतले. महिलांनी जर मनावर घेतले तर शक्य आहे. शिवाय शौचालय.बांधकामासाठी बीपीएल कुटूंबाला 17 हजार (शहरी) व 12 हजार  रुपये (ग्रामीण) असे अनुदान सुद्धा दिले जाते.
- सोमनाथ शेट्ये, अतिरिक्त आयुक्त, मनपा अमरावती तथा सदस्य, राज्यस्तरीय तपासणी समिती 

चिखली जि. बुलडाणा : शौचास जाणाऱ्या नवऱ्यावर गुड माॅर्निंग पथकाने कारवाई केली म्हणून अपमान सहन न झाल्याने पत्नी पार्वती शंकर साेनारे हिने मंगळसूत्र माेडले. मिळालेल्या पैशातून घरी शौचालय बांधून घेतले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत चिखली येथे दिलेल्या भेटीत राज्यस्तरीय समिती सदस्य तथा अमरावती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त साेमनाथ शेट्टे यांनी या कुटूंबाचा गौरव केला. जिंतूरचे मुख्याधिकारी जयवंत साेनवणे, श्री. गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था (बुलडाणा)चे सतीश कायंदे, 'सकाळ'चे पत्रकार याेगेश फरपट, चिखलीचे मुख्याधिकारी वसंत साेनाेने, अधीक्षक अर्जून इंगळे उपस्थित हाेते. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त शहरे घोषित करण्यासाठी निवड झालेल्या नगरपरिषद, महापालिका क्षेत्राची पाहणी राज्यस्तरीय समितीकडून सुरू आहे. 20 ते 22 ऑगस्टदरम्यान चिखली येथे समितीने भेट दिली. त्यात शौचालयसाठी पार्वतीने मंगळसूत्र मोडल्याचे निदर्शनास आले. 

पार्वतीचा घ्यावा आदर्श
पार्वतीने पतीचा अपमान सहन न झाल्याने मंगळसूत्र मोडून घरी शौचालय बांधून घेतले. महिलांनी जर मनावर घेतले तर शक्य आहे. शिवाय शौचालय.बांधकामासाठी बीपीएल कुटूंबाला 17 हजार (शहरी) व 12 हजार  रुपये (ग्रामीण) असे अनुदान सुद्धा दिले जाते.
- सोमनाथ शेट्ये, अतिरिक्त आयुक्त, मनपा अमरावती तथा सदस्य, राज्यस्तरीय तपासणी समिती 

समुपदेशनातुन शौचालय निर्मितीवर भर
चिखली शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आम्ही महिलांचे समुपदेशन केले. स्वच्छतेसाठी घरी  शौचालय गरजेचे आहे, याचे महत्व महिलांना पटवून दिले. 
नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह, सर्व कर्मचारी व बचत गटाच्या महिलांचे विशेष सहकार्य लाभले.
- वसंत इंगोलेे, मुख्याधिकारी, चिखली

Web Title: Akola news women build toilet in home