तुम्ही जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, कंफ्यूटरवर काम करीत असाल तर ही येऊ शकते अडचण!

 akola news,This can be a problem if you are working on mobile, TV, computer for a long time!
akola news,This can be a problem if you are working on mobile, TV, computer for a long time!

अकोला : कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन असल्याने सारीच मंडळी घरातच अडकली आहे. तसेच या काळात जिह्यातील तापमानाने चाळीशी पार केली असल्याने घरात देखील उष्णता जाणवत आहे. घरात बसून काय करायचे..हा विचार प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे मनोरंजन म्हणून टीव्ही,संगणक आणि मोबाइलचा अती वापर वाढल्याने स्क्रीनिग टाईम वाढला आहे. तेव्हा डोळ्यांच्या समस्या वाढल्या असल्याचे समोर येत आहे.

लॉकडाउनमुळे घरात बसून सुरुवातीला घरात कुटुंबासोबत बैठे खेळ खेळणारे देखील या खेळांचा कंटाळा आल्याने आणि कोरोना संबंधित वृत्त बघण्यासाठी किंवा मनोरंजन म्हणून टेलिव्हिजन, कॉम्प्युटर आणि मोबाईल या उपकरणांचा अतिवापर करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही विद्यार्थ्यांच्या खाजगी शिकवणी ऑनलाइनपद्धतीने सुरू झाल्या आहेत; तसेच बहुतांश मिटिंग देखील वेगवेगळ्या अँपद्वारे सुरू आहेत. त्यामुळे मे हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळेच डोळ्यांचा त्रास वाढल्याचे चित्र शहरात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच नेत्ररोगतज्ञांकडून उपचार करून घेण्यासह काही प्राथमिक उपाय करणे आवश्‍यक आहे.

स्क्रीनिंग टाइमिंग बरोबरच उन्हाचा तडाखा
लॉकडाऊनचा हा काळ नेमका उन्हाळ्यात आल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. बाजार, दूध आणि किराणा साहित्य खरेदीची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत आहे. नेमकं यावेळी उष्णतेचा कडाका जास्त असतो. या दरम्यान लोक खरेदीसाठी बाहेर पडतांना दिसत आहे. तसेच पोलिस या प्रखर उन्हाच्या तडाख्यात देखील आपली सेवा बजावतांना दिसत आहे. अशा सर्व व्यक्तींना डोळ्यांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत.

काय जाणवतो त्रास
डोळा दुखणे, डोळा लाल होणे, डोळ्यातुन पाणी येणे अशा समस्या जाणवतात. डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ नये; यासाठी नेत्रतज्ञांना दाखविणे गरजेचे असते. तसेच नेत्रपटलास युव्ही लाईटमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो, तसेच पापण्यांच्या त्वचेसही सनबर्न होऊ शकते, त्यासाठी लॉकडाऊनच्या काळात उगाच बाहेर पडणे टाळावे किंवा घराबाहेर पडतांना मास्क सोबत टोपी, रुमाल, स्कार्फ व सनग्लास वापरावा. लॉकडाऊनच्या काळात घरातील सर्वच सदस्यांचा टी.व्ही., कॉम्प्युटर, मोबाईलचा जास्त वापर होत आहे; तसेच हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रुंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडण्याची दाट शक्‍यता असल्याने, डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, खाज येणे, पाणी येणे असा त्रास सुरु होतो, याला कॉम्प्युटर कव्हजन सिंड्रोम असे म्हणतात. अशा वेळी नेत्रतज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असते.

कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी अशी घ्या काळजी

  • - नियम 20-20-20 ः दर वीस मिनिटांनी, 20 फुट कॉम्प्युटर स्क्रीनपासून दूर बघणे, 20 वेळा पापण्यांची उघडझाप करणे.
  • - स्क्रीन डोळ्यांच्या उंचीच्या खाली 4 ते 5 इंच असावी.
  • कॉम्प्युटर स्क्रीनपासून डोळ्यांचे अंतर 22 ते 28 इंच ठेवावे.
  • सलग दोन तास कामानंतर मिनिटे डोळ्यांना विश्रांती दयावी.
  • रुममधील दिव्यांची व्यवस्था अशी असावी.

मनोरंजन व इतर कामासाठी सध्या स्क्रीनिंग टायमिंग वाढला असला तरी यामध्ये आपण ट्रेनिंग टायमिंगला मध्येच दहा ते पंधरा मिनिटांचा ब्रेक घेऊन नंतर आपले काम सुरु करु शकतो सोबतच पाणी जास्त प्यावे आणि थंड पाण्याने डोळे मध्ये दोन काढावे यापेक्षाही अधिक त्रास जाणवत असल्यास नेत्ररोग तज्ञ योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
- डॉ.प्रियदर्शनी शोभने, नेत्ररोग तज्ञ,अकोला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com