'बॉलिवूडचा' हिरो नव्हे, हे तर जिल्हाधिकारी; अकोल्यात अनोखा उपक्रम

'बॉलिवूडचा' हिरो नव्हे, हे तर जिल्हाधिकारी; अकोल्यात अनोखा उपक्रम
'बॉलिवूडचा' हिरो नव्हे, हे तर जिल्हाधिकारी; अकोल्यात अनोखा उपक्रम

अकोला - सकाळी 11 ची वेळ. अशोक वाटिका चौकात सिग्नलवर वाहनचालकांचे लक्ष अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्यामोठ्या पोस्टरवर गेले. जांभळ्या रंगाची सफारी व जांभळ्याच रंगाचा गॉगल घातलेला व्यक्ती व इंग्रजीत 6 असे लिहिलेले दिसून आले. 'फॉर्म नं. 6' नावाचा मराठी चित्रपट असून 'साऊथ'चा हिरो त्यात असल्याची चर्चा सुरू होती. तेवढ्यात कुणीतरी बोलले 'अहो, भाऊ ते जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय' आहेत. मतदार नोंदणीसाठीच्या 'फॉर्म नं. 6' भरण्यासाठी ते युवा वर्गाला आवाहन करीत आहेत, असेही कोणीतरी सांगितले.

सध्या भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 1 ते 31 जुलै दरम्यान 18 ते 21 वर्षाच्या तरूण मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. तरूण व पात्र प्रथम मतदारांचे नाव नोंदवून घेण्यासाठी संबधीतांचे अर्ज प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने स्विकारणे, नमुना क्रमांक 6 बिएलओ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी भेटी देवून गोळा करणे व मोबाईलचा वापर करून नाव नोंदणी करणे आदी कामे जोमाने सुरू आहेत. नव्याने सैन्यात भरती झालेले युवक, दिव्यांग पण वयाची 18 वर्षे पुर्ण केलेले मतदार यांचा शोध घेवून त्यांच्या नावाची नोंदणी करण्याचे कामही बिएलओंच्या मदतीने सुरू आहे. या मोहिमेची कलरफूल पोस्टरद्वारे आकर्षक जाहिरात करण्यात आली आहे. ही जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. जाहिरातीच्या पोस्टरमध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय झळकत आहेत. नेहमीच्या 'लुक'पेक्षा त्यांचा पोस्टरवरील 'लूक' थोडा हटके असल्याने या प्रकाराकडे लक्ष वेधले जात आहे.

काय आहे फॉर्म नं. 6
18 वर्षे पूर्ण असलेला कोणताही युवक वा युवती मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेण्यासाठी अर्ज करू शकते. प्रत्यक्ष वा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धती आहेत. मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेण्यासाठी फॉर्म नं. 6 भरून जवळच्या मतदान केंद्रावरील बिएलओ यांच्याकडे किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक कक्षात जमा करावा.

वेबसाईटला भेट द्या
निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या वेबसाईटवर सुद्धा ऑऩलाईन नावाची नोंदणी करता येवू शकते. संपुर्ण तपशिल भरल्यानंतर आपोआप संबधीत युवक/युवतीचा अर्ज निवडणूक आयोगाकडे जमा होतो.

वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला कोणताही युवक वा युवती मतदार फॉर्म नं. 6 भरून यादीत आपले नाव समाविष्ट करून घेवू शकते. यासाठी 8 आणि जुलै रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. मतदार यादीत नाव नोंदवून देश घडवा.
- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com