अकोला पंचायत समिती सभापती-उपसभापती वाद सर्वाेच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

अकाेला पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाचा वाद सर्वाेच्च न्यायालयात पाेहाेचला अाहे. पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वेाच्च न्यायलयात धाव घेतली अाहे.

अकाेला- अकाेला पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाचा वाद सर्वाेच्च न्यायालयात पाेहाेचला अाहे. पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वेाच्च न्यायलयात धाव घेतली अाहे.

अकाेला पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाच्या निवडणूक शिवसेना-भाजप युतीचा झेंडा फडकला हाेता. सभापतीपदी शिवसेनेचे अरूण शंकर पराेडकर अाणि उपसभापती पदाची माळ भाजपचे गणेश वासुदेव अंधारे यांच्या गळ्यात पडली हाेती. परंतु महापालिका हद्दवाढीनंतर सभापती, उपसभापतीचे सदस्यत्व संपुष्टात अाले हाेते.

मात्र, सभापती व उपसभापती हे संपूर्ण पंचायत समितीचे असल्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले हाेते अाणि स्थगिती मिळाल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला हाेता. नंतर सभापती व उपसभापतींची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही पदे तेव्हापासून रिक्तच अाहेत.

Web Title: Akola Panchayat samiti sabhapati and Deputy sabhapati dispute in Supreme Court