अकोलामध्ये निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही कायम

akola
akola

अकोला - रखडलेल्या वेतनासाठी जीएसीच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही कायम आहे. दरम्यान डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेत डीन डॉ.कुसुमाकर घोरपडे यांच्यावर प्रश्न सोडविण्यात स्वारस्य नसल्याचा आरोप केला आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांचे सहा महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याने सुमारे ९१ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवार (ता.२२) पासून बेमुदत संप पुकारला आहे. याद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

मंगळवारी (ता.२३) डॉ. मिलिंद खडसे यांच्या नेत्रुत्वात डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर येवून डीन डॉ.घोरपडे यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. कर्तव्यावर रुजू न झाल्यास कार्यमुक्त करू, अशा धमक्या देवून आमच्या समस्या दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप डॉ.खडसे यांनी केला आहे. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यत आमचा संप कायम राहणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यावतीने स्पष्ठ करण्यात आले आहे. त्यामुळे हा संप चिघळण्याची चिन्हे आहेत. परिणामी रुग्णसेवा प्रभावित होवू शकतो. 

सायंकाळ पर्यंतची वेळ 
डॉक्टरांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र असा संप पुकारुन आरोग्यसेवेला वेठीस धरण्याचा प्रयत्न योग्य नाही. डॉक्टरांनी सायंकाळपर्यंत (ता.२३) रुजू व्हावे अन्यथा त्याच्याविरूध्द नियमानुसार करवाई करू, असे अधिष्ठाता डॉ.कुसुमार घोरपडे यांनी 'सकाळ'ला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com