PM Kisan : सन्मान निधीपासून शेतकरी वंचित राहणार? १४व्या हप्त्यासाठी 'या' तीन बाबी आवश्यक

PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaesakal

अकोला : केंद्र शासनामार्फत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभाची चौदावी किस्त जमा करण्यात येणार आहे. परंतु तत्वपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत असणे, ई-केवायसी प्रमाणिकरण व बॅंक खाती आधार संलग्न करण्याचे केंद्र शासनाने बंधणकारक केले आहे.

या तीन बाबींची पूर्तता न केल्यास शेतकऱ्यांना १४व्या किस्तीचा लाभ देण्यात येणार नाही, असे शासनामार्फत स्पष्ट करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना चौदाव्या किस्तीच्या लाभापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

PM Kisan Yojana
The Kerala Story show in FTII : 'एफटीआयआय'मध्ये केरला स्टोरीचे स्क्रिनिंग पोलीस बंदोबस्तात

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३व्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे, परंतु

PM Kisan Yojana
Ajit Pawar : लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही, अजित पवार 2000 नोटबंदीच्या पाठिशी?

जिल्ह्यातील जवळपास दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी २३ हजार ८९६ शेतकऱ्यांचे बॅंक खाते आंधार संलग्न नाहीत. त्यामुळे संबंधितांच्या बॅंक खात्यात १३व्या हप्त्याची रक्कम जमा होणार नाही. संबंधितांना लाभ हवा असल्यास इंडिया पोस्ट बॅंकेत खाते उघडावे लागेल.

जिल्हा प्रशासनाचे तहसिलदारांना आदेश

जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील आधार संलग्न नसलेले बॅंक खाते आधार संलग्न करावयचे बाकी आहेत. अशा लाभार्थ्यांची बॅंक खाती इंडिया पोस्ट पेमेंट्‍स बॅंकेत उघडणेबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील आधार संलग्न बाकी असलेल्या लाभार्थ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्‍स बॅंकेत खाते उघडणेबाबत सुचित करण्यात यावे. जेणेकरुन सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पुढील लाभ प्राप्त होतील, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सातही तालुक्यातील तहसिलदरांना देण्यात आले आहेत.

ई-केवायसी रखडले लाभार्थी

तालुका संख्या

अकोला - ४२३६

अकोट - ३९७५

बाळापूर - ३११५

बार्शीटाकळी - ३१८८

मूर्तिजापूर = २८८८

पातूर - २९१७

तेल्हारा - ३५७७

एकूण २३८९६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com