Lockdown : मुख्याधिकारी आले, त्यांना दिसले असे काही; मग केली कारवाई

mukhyadhikari.jpg
mukhyadhikari.jpg

मूर्तिजापूर (जि. अकोला) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सम व विषम दिवशी अंमलात अणल्या जाणाऱ्या लॉकडाउन दरम्यान, पाळावयाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या 77 ग्राहक व दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी कायदा मोडीत काढणाऱ्यांवर मंगळवारी चांगलीच जरब बसविली व 26 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

प्रतिष्ठानांवर उसळी होती गर्दी
सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणारे 70, सोशल डिस्टन्सिंग न राखणारी 4 दुकाने व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे तीन जण मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईचे शिकार ठरले. 144 कलमांतर्गत सर्वत्र संचारबंदी लागू आहे. असे असतानाही हरे माधव, राणी सती, नटराज प्रोव्हीजन्स् आणि मुलचंद तिंडलमल किराणा या 4 प्रतिष्ठानांविरुद्ध सामाजिक अंतर ठेवण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करून त्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंड ठोठावून वसूल करण्यात आला. या चारही ठिकाणी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती व सामाजिक अंतर राखण्याची तसदी न घेता व्यवहार सुरू होते. मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान ही बाब लक्षात येताच त्यांनी दंडात्मक कारवाई केली.

याआधीही केली कारवाई
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्याचे प्रमाण प्रचंडा वाढले आहे. आपल्या शहरातील फेरफटक्या दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी हा कायदा मोडणाऱ्या 70 नागरिकांना प्रत्येकी 200 रूपये दंड ठोठावून जरब बसविली. सार्वजनिक ठिकाणी थुंकून संसर्ग फैलावणाऱ्यांची संख्या तर खूप जास्त आहे. परंतु, ते कचाट्यात फार कमी सापडतात. अशा तिघांना लक्ष्य करीत मुख्याधिकारी लोहकरे यांच्या पथकाने त्यांना प्रत्येकी 300 रुपये दंड ठोठावला. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जमाव करणे कायद्याने गुन्हा आहे.

प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्क लावणे साथरोग कायद्यांतर्गत बंधनकारक आहे. या बाबत येथील नागरिक व दुकानदार गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यामुळे मुख्याधिकारी सतत गस्तीवर असतात. यापूर्वी त्यांनी अनिश्चित कालावधीसाठी दोन दुकानांना सील ठोकले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकने हा अत्यंत घातक प्रकार असून, त्याकडे या शहरात कटाक्षठेवला जातो. पालिकेतील आरोग्य निरीक्षक विजय लकडे, मसरूल खान, अभियंता पुरुषोत्तम पोटे, प्रसाद सूर्यवंशी, अमोल बेलोटे, शालीग्राम यादव, गजू पवार यांच्या पथकाला पोलिस निरीक्षक दत्तात्रय अव्हाळे, उपनिरीक्षक शिंदे, हेकॉं दीपक इंगळे यांनी सहकार्य केले.

सार्वजनिक ठिकाणी थुंकनाऱ्यांची गय नाही
सर्वांच्या सोयी विचारात घेऊन कोरोना विरोधी लढा अधिक तीव्र करण्यासाठी संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सम-विषम दिवसात विभागली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंग आवश्यकच आहे. मास्क अनिवार्यच आहे. सार्वजनिकठिकाणी थुंकनाऱ्यांची तर गयच केली जाणार नाही. इतरांनी धडा घ्यावा.
-विजय लोहकरे, मुख्याधिकारी, न.प.मूर्तिजापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com