अकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट

अकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट

अकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात अाला. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील काही ठाणेदारांचे पोलिस ठाणे बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अाहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून अधिकृत दुजोरा देण्यात अाला जरी नसला तरी पोलिस वर्तुळात गुरुवारी (ता. 15) दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.

जिल्ह्यातील अकोट शहर पोलिस ठाणे, बाळापूर अाणि शहरातील खदान पोलिस ठाण्यातील ठाणेदारांच्या बदली होणार असल्याची माहिती अाहे. याबाबत जिल्हा पोलिस कार्यालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात अाली नाही. तरी अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांची जिल्हा विशेष शाखेत तर संतोष महल्ले यांची अकोट शहर, अनिल जुमडे यांची बाळापूर अाणि विनोद ठाकरे यांची खदान पोलिस ठाण्यात बदली होणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली अाहे. बदल्या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले. मात्र गुरुवारी पोलिस वर्तुळात हीच चर्चा रंगत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com