अकोल्यात 6.5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

अकोला - हरित महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत राज्यात 1 ते 7 जुलैदरम्यान चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यात सहा लाख 40 हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

त्याकरिता वन विभाग व सामाजिक वनिकरण विभागाकडे नऊ लाख 45 हजार रोपे उपलब्ध असल्याची माहिती उपवन संरक्षक (प्रादेशिक) प्रकाश लोणकर यांनी दिली.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी व हरित महाराष्ट्र करण्याकरिता चार कोटी वृक्ष लागवडीचा सरकारचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशासनाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. अकोला जिल्ह्यात वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करण्यासीठी रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांना विविध सूचना दिल्या.

Web Title: akola vidarbha news 6.5 lakh tree plantation