शेतकऱ्यांचे आंदोलन सरकारचे अपयश - सुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

अकोला - महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा माणल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासते आहे, हे भाजप सरकारचे अपयश असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज व्यक्त केले.

येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की, आज समाजातील प्रत्येक घटकाला आंदोलन करावे लागत आहे. सराफा, डॉक्‍टर, वकील, औषधविक्रेर्त्यांना आंदोलन करावे लागले. आता शेतकरीही त्याच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला हे सरकारचे मोठे अपयश आहे.

विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, असे नेहमी सांगणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा देऊन कुंडली बघण्याचा व्यवसाय सुरू करावा. त्यांच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा असतील, असा टोलाही सुळे यांनी लगावला.

Web Title: akola vidarbha news government unsuccess in farmer agitation