चलनातून बाद केलेल्या नोटा अकोल्यात जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

अकोला - नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रविवारी (ता.30) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. नोटा नागपूर येथून अकोल्यात आल्याची माहिती असून, येथील खोलेश्‍वर परिसरातून त्या जप्त केल्या. ज्यांच्याकडे नोटा सापडल्या त्यांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकीही ताब्यात घेतली.

नागपूरहून हजार रुपयांच्या नोटांचे नऊ बंडल व पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन राकेश अशोक तोहगावकर (रा. कौलखेड) हा दुचाकीवर खोलेश्‍वर परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा रचून राकेशला अडवून चौकशी केली असता, त्याने चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या नोटा आणल्याचे सांगितले. या नोटा बदलून देण्यासाठी नागपूर येथून आणल्याची माहितीही त्याने सांगितली. पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकी व चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या असून, त्याला नोटीस देऊन सोडून दिले. पुढील तपास नागपूर प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: akola vidarbha news old currency seized