सप्टेंबरमध्ये ‘जागर जाणिवां’चा पार्ट २ - खा. सुप्रियाताई सुळे

मंगळवार, 20 जून 2017

अकाेला - ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ या अभियानाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्येविराेधात प्रखरतेने प्रकाश टाकण्यात आला हाेता. त्याचधर्तीवर १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हुंडाबळीविराेधात जनजागरण केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.

अकाेला - ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ या अभियानाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्येविराेधात प्रखरतेने प्रकाश टाकण्यात आला हाेता. त्याचधर्तीवर १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हुंडाबळीविराेधात जनजागरण केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अकाेला दौऱ्यावर अाले असतांना त्यांनी मंगळवारी (ता.२०) ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत ते प्रश्न साेडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेश प्रवक्ता डॉ. आशाताई मिरगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे उपस्थित हाेते. पाच वर्षापूर्वी स्त्रीभृणहत्येचे प्रमाण वाढले हाेते. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच समाजात जागर करण्यासाठी ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ हे अभियान २०१२ मध्ये राज्यभर राबविण्यात आले हाेते.

अशाच प्रकारच्या आणखी एका प्रश्नाने डाेके वर काढले आहे. ताे म्हणजे हुंडाबळी. याविराेधात ‘जागर जाणिवांचा पार्ट २’ हे अभियान राबविले जाणार आहे. अकाेला जिल्ह्यातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट आहे. याबाबत जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांड्येय यांच्यासाेबत फाेनवर चर्चा झाली आहे. त्यांनी २४ तारखेला सकाळी ११.३० वाजता चर्चेसाठी बाेलावले आहे. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख हे स्वतः काही शेतकऱ्यांना साेबत नेवून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. याबाबत काय ताेडगा निघाला याबाबत स्वतः जिल्हाधिकारी अपडेट देतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही संवेदनशील आहाेत. वऱ्हाडासाठी मिळालेला नाबार्डचा पैसा काही लाेकप्रतिनिधींच्या मर्जीने इतर दुसऱ्या याेजनेत वळवण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. याचीही चौकशी करण्याच्या सुचना शासनाला देण्यात येतील.

खारपाणपट्यातील समस्या निकाली काढण्यासाठी मिळालेल्या पैशाचा याेग्य विनियाेग हाेण्यासाठी आम्ही पुढाकार घेवू अशी ग्वाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.

सरकारने सॅनिटरी नॅपकीन सुध्दा साेडले नाही
सरकार काेणत्या गाेष्टीवर कर लावेल याचा नेम राहिला नाही. सॅनिटरी नॅपकीनवर कर लावण्याचा घाट रचला आहे. महिलांची ती गरज आहे याचेही भान सरकारला राहिले नसल्याचा आराेप खा. सुप्रियाताई सुळे यांनी केला. अर्थमंत्र्यांना चर्चगेटवर राबवलेल्या स्वाक्षरी अभियानाचा अहवाल पाठवला. मात्र तरी सरकारला जाग आली नाही. शेवटी पंतप्रधानांना ‘पॅड’ पाठवून निषेध नाेंदवला. तरी सॅनिटरी नॅपकीनवरील कर कमी करण्यासाठी सरकार उदासिन असल्याचे दिसून येते अशा महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ म्हणाल्या.