एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

अकाेला - लहान उमरी परिसरातील एका शिकवणी वर्गातील एक युवती शिकवणीवर्ग चालविणाऱ्या शिक्षकाच्या एकतर्फी प्रमात पडली. या प्रकरणावरून, युवतीच्या कुटूंबीयांनी भाेजने नामक शिक्षकाला जबर मारहाण केली. या प्रकरणी सिव्हील लाईन पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, परिसरातील एक युवती त्याच्याकडे शिकवणीसाठी आली. तिने शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. काही दिवसातच शिक्षकासोबत परिचय झाल्यावर तिने शिक्षकाचा मोबाइल क्रमांक घेतला. सदर युवती भाेजने नामक शिक्षकाला फोन करून त्याच्यासोबत संभाषण करू लागली. युवती शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमात पडली. शिक्षकाने सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु, युवती त्याला त्रास देऊ लागली आणि लग्न करण्यासाठी आग्रह करू लागली. शिक्षकाने तिला नकार दिल्यानंतरही तिचे प्रयत्न सुरू होते. हा प्रकार युवतीच्या कुटुंबीयांना कळल्यावर, त्यांनी गुरुवारी दुपारी शिकवणी वर्गामध्ये घुसून शिक्षकासोबत वाद घातला आणि त्याला मारहाण केली. यात शिक्षकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. याप्रकरणी शिक्षकाने सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून, सिव्हिल लाईन पाेलिसांनी गुरुवारी सायंकाळी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: akola vidarbha teacher beating