अकोल्याच्या महिला ‘लयभारी’

win.jpg
win.jpg

अकोला : वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण करीत अकोला संघाने चार सुवर्ण, एक कांस्यपदकासह 26 गुण मिळवित जेतेपद पटकाविले. तर मुंबईने 21 गुणांसह दुसरे, पुणे संघाने 11 गुणांसह तिसरे स्थान पटकाविले.


वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धा स्व. वसंत देसाई स्टेडियमवर घेण्यात आली असून, या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सामने 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास खेळविण्यात आले. या अंतिम सामन्यात अकोला शहर संघाने विविध वजनगटात चार सुवर्ण, एक कांस्यपदकासह 26 गुण मिळवित जेतेपदावर नाव कोरले. तर मुंबई संघाने 21 गुणांसह दुसरे तर पुणे संघाला 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, माजी सहाय्यक जिल्हाधिकारी ओमप्रकाश अग्रवाल, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, डॉ. हेडा, पंकज कोठारी, गणेश बोरकर, ॲड. विजय शर्मा, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, डॉ. अमोल केळकर, डॉ.राधीका केळकर, वंदना पिंपळखरे, गुरूमित सिंह गौसल, अधीक्षक अभियंता नरेंद्र चौधरी, राज्य प्रशिक्षक सतीशचंद्र भट आदींच्याहस्ते विजेत्याना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत बी.जी. अगोने, एकनाथ चव्हाण, मुंलजी कोहली, अजीत जयस्वाल, डॉ. अर्चना गुप्ता, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, विजय यादव, अनंता चोपडे, विजय गोटे, विशाल सुनरीवाल, प्रियदर्शनी पडवाल, रिना माने, सेय्यद असलम, विजय मेंडे, मोहनी बुटे, विकास काटे आदींनी पंच, सहाय्यक म्हणून काम पाहिले. सुवर्णपदक विजेता महिला खेळाडू केरळ येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रिय महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू
या स्पर्धेत 48 किलोमध्ये दिया बचे (अकोला), 51 किलोमध्ये संगिता रूमाले (अकोला), 54 किलोमध्ये तेजस्वीनी जिवराज (औरंगाबाद), 57 किलोमध्ये लक्ष्मी मेहरा (पुणे), 60 किलोमध्ये पुनम कैथवास (अकोला), 60 किलोमध्ये सिमरन (मुंबई), 69 किलोमध्ये भाग्यश्री पुरोहित (मुंबई), 75 किलोमध्ये मनिषा ओझा (मुंबई), 81 किलोमध्ये ऋतजा देवकर, 81 किलोपेक्षा अधिक वजन गटात शायन पठान (अकोला) यांनी सुवर्णपदके पटकाविली.

यांनी पटकाविले पुरस्कार
स्पर्धेत बेस्ट चॅलेंजर महिला पुरस्कार नितू सुतार, बेस्ट प्रफॉमिंग महिला पुरस्कार सितान सिमरन मुंबई यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट पंच म्हणुन रिया माने (ठाणे), उत्कृष्ठ परीक्षक विनोद राठोड, उत्कृष्ठ प्रशिक्षक काठे (मुंबई) यांना मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com