जिल्हा परिषदेमध्ये पदांसाठी रस्सीखेच

akola zp competition for chairperson
akola zp competition for chairperson

अकोला : जिल्हा परिषदेतील दहा विषय समित्यांच्या रचनेसाठी मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभेत सदस्य पदांच्या निवडीसंदर्भात एकमत न झाल्याने दुपारी 2.55 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू होऊ शकली नाही. सदस्यांची निवड अविरोध व्हावी, यासाठी सभा सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी व विरोधकामध्ये चर्चेच्या फैरी सुरू राहिल्या. दुपारी सभा सुरू झाली. परंतु, अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड व सभापती पंडित गुरुजी सभागृहातून निघून गेले. त्यामुळे सदस्यांच्या निवडीवरून दुपारी ३.३० पर्यंत सताधाऱ्यांमध्येच एकमत होऊ शकले नाही.

दहा विषय समित्यांच्या रचनेसाठी मंगळवारी (ता. 11) दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृह सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. सदस्यांच्या निवडीसाठी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात आले. त्याअंतर्गत जलव्यवस्थापन-पाणी व स्वच्छता समितीसाठी 6 सदस्यांनी 6, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य पदासाठी 8 सदस्यांनी 8, अर्थ समितीच्या 8 सदस्य पदासाठी 8 सदस्यांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे या विषय समित्यांची निवडणूक अविरोध झाली. परंतु बांधकाम, पशुसंवर्धन, शिक्षण व क्रीडा तसेच आरोग्य समितीच्या प्रत्येकी आठ-आठ सदस्यपदासाठी 9 व 10 सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 

स्थायी व समाज कल्याण संदर्भात एकमत नाही
स्थायी समितीच्या सदस्य पदांसह समाज कल्याण समितीच्या सदस्य पदासाठी प्रत्येकी 10 व 14 सदस्यांनी अर्ज दाखल केले. समितीमध्ये सदस्यांची संख्या केवळ आठ असल्याने या समिती मध्ये सदस्य निवडीवरून जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या.  शिवसेनेच्या दोन व एका अपक्ष सदस्याला स्थायी समितीमध्ये स्थान मिळावे यासाठी सभा सुरू झाल्यानंतर सुद्धा सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसून आली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यासंदर्भात एकमत न झाल्याने सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे सभागृहात इतर महिला व पुरुष सदस्य बसून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com