अकोलेकरांना वळवाचा तडाखा! मॉन्सूनपूर्व पावसाने दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

अकोला  ः वाढलेले तापमान आणि प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या अकोलेकरांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा दिला मिळाला. मृगनत्रापूर्वी पडलेल्या या वळवाच्या पावसाने एकीकडे दिलासा दिला असताना, वादळी वाऱ्यामुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडं कोलमडून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. 

अकोला  ः वाढलेले तापमान आणि प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या अकोलेकरांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा दिला मिळाला. मृगनत्रापूर्वी पडलेल्या या वळवाच्या पावसाने एकीकडे दिलासा दिला असताना, वादळी वाऱ्यामुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडं कोलमडून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. 

आठवडाभरात अकोल्यासह वऱ्हाडात माॅन्सून धडकणार असे संकेत वेधशाळेने दिले होते. त्यामुळे उष्णतेच्या झळा, घामांच्या धारा आणि कोंदट वातावरणाने त्रस्त अकोलेकरांना,चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असेलल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांना अंकूर फुटले होते. निसर्गानेही अपेक्षाभंग न करता शुक्रवारी जोरदार माॅन्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळे अकोलेकरांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. या पावसाने मॉन्सून वेळेवर येण्याच्या शक्यता वाढली आहे. 
पावसाच्या हजेरीने नागरिकांना गारवा मिळाला, मात्र पावसासोबतच वादळानेही थैमान घातल्याने जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाल्याचेही माहिती आहे.

  • महामार्गांवर खोळंबा

वादळी वाऱ्यासह शुक्रवारी बरसलेल्या पावसाने शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सायंकाळी महामार्ग क्रमांक सहावर जागोजागी मोठे वृक्ष कोलमंडून पडले. केबलच्या तारा तुटून रस्त्याच्या मधोमध लोंबकळत होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूकीचा खोळंबा झाला होता.

  • ग्रामीण भागात वादळी थैमान

वादळी वाऱ्याने शहरासह ग्रामीण भागातही थैमान घातले. पातूर, बाळापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळीवाऱ्यांने थैमान घातले. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, रस्त्यावर वृक्ष कोलमंडली, काही भागात विजेच्या तारा तुटल्या व रिधोरा येथील विद्यूत खांबही कोसळला.

 डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. त्यामुळे या राेडवरून जाणाऱ्या  चालकांना वाहन चालवतांना कसरत करावी लागत हाेती. 

जुने अारटीअाे अाॅफिसकडून सहकारनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली अाणि विद्युत ताराही तुटून रस्त्यावर पडल्य. त्यामुळे माेठ्या वाहनांच्या चालकांनी या राेडवरून जाणे टाळले. 

शहरातील जठारपेठ, न्यू तापडीया नगर, गाैरक्षण राेड, गांधी राेड, जुने शहरात दमदार पाऊस झाला. डाबकी राेडवरील काही घरांवर असलेली टिनपत्रे उडून गेली. 

एमआयडीसी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणीचे टिनपत्रे उडून गेले. काही ठिकाणी गोदामांनीही फटका बसला.  

 शहरातील भाजी बाजारांमध्येही पाऊस झाला. उन्हापासून संरक्षणासाठी भाजी-फळ विक्रेत्यांनी बांधलेल्या प्लास्टिकच्या  ताडपत्र्या वाऱ्यामुळे फाटल्या. 

बाळापूर, बार्शीटाकाळी, तेल्हारा अाणि अकाेट तालुक्यात काही ठिकाणी तुरळक सरी काेसळल्या. बाळापूर राेडवरही पाऊस झाला. गुरुवारी रात्री पातूर तालुक्यात जाेरदार पाऊस झाला हाेता. 
 
रिधोरा -व्याळा दरम्यान  वादळीवाऱ्याने थैमान घातले. दहा ते बारा घरांवरील छपरे, टिनपत्रे उडून गेली.  महामार्गावरील वृक्ष उन्मळून पडली. काही ठिकाणी तर  वाऱ्यांच्या प्रचंड वेगाने टिनपत्रे दोनशे फुटांपर्यंत उडाली हाेती. काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळले. 
 
अकोट राेडवरील वाहतूक ठप्प; अकोलानजीकच्या रेल्वे गेट जवळ पाणी साचले हाेते. १५ ते २० कि.मी. रस्त्याच्या दाेन्ही बाजूने वाहने उभी हाेती. अनेकांना वाहनांमध्ये बसून राहवे लागले.

 

Web Title: akolekar's heavy rain Monsoon rains relief