अकोट तालुक्यातील अंभोडा शेतशिवारात खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

अकोट : तालुक्यातील चंडिकापूर येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण ढोकणे (वय. ५२) हे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता, गुरुवारी दुपारी अंभोडा शेतशिवारात त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. 

हरिदास श्रीराम ढोकणे (वय. ४०) व दोन व्यक्तींनी खून केल्याचे सूत्रांनी सांगितले. मृत्यूपूर्व जबानीत मृतक ज्ञानेश्वर ढोकणे यांनी त्यांना आरोपीने काठीने मारहाण केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच, अकोट ग्रामीणचे ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील चौसाळा येथून गुरुवारी मध्यरात्री तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Web Title: Akot Taluka Anbhoda Agriculture Farm Murder