esakal | नागपूरची कन्या अक्षिता ठरली "डेलीवूड मिस इंडिया'
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

नागपूरची कन्या अक्षिता ठरली "डेलीवूड मिस इंडिया'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिल्ली येथे पार पडलेल्या डेलीवूड मिस इंडिया या सौंदर्यवती स्पर्धेत नागपूरची कन्या अक्षिता जायस्वालने तब्बल अकरा हजार स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावला. महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेदरम्यान विचारण्यात आलेल्या अनेक कठीण प्रश्‍नांना तिने सकारात्मक उत्तर देत परीक्षकांवर आपली छाप सोडली.
आपल्या यशाची माहिती देण्यासाठी अक्षिताने आपल्या कुटुंबीयांसोबत आज पत्रकार परिषद घेतली. ती म्हणाली, देश अनेक वर्षांपासून आतंकवादाच्या समस्येशी झगडतो आहे. त्यामुळे देशवासीयांची मानसिकता नकारात्मक झाली आहे. सर्वसामान्यांमधली नकारात्मकता देशाच्या विकासात अडथळा ठरत असून, ही नकारात्मकता नष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठीच प्रयत्न करायचे असल्याची इच्छा अक्षिता जायस्वालने व्यक्त केली.
वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी इतक्‍या मोठ्या सौंदर्यवती स्पर्धेचा झगमगता मुकुट पटकावणाऱ्या अक्षिताने रॅम्पवर आपली चुणूक दाखवली. त्यासाठी बोलण्याच्या पद्धती, स्वभाव, वागणूक, बुद्धिमत्ता, फिटनेस, शारीरिक आणि मानसिक सौंदर्य या निकषांच्या आधारे तिला गुण मिळाले असून, सध्या तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षिताने आपल्या यशाचे श्रेय ओनम व विनोद अवचट यांच्यासह कपिल गौहरी, डॉ. दीपाली जायस्वाल, राजेंद्र जायस्वाल, शिरीन जायस्वाल यांना दिले आहे.

loading image
go to top