अरे बापरे! तळीरामांनीच भरली सरकारची तिजोरी

Taliram
Taliram

अकोला : एकीकडे इतर व्यवसाय डबघाईस येत असतानाच मात्र, दुसरीकडे मद्यविक्रीचा आलेख दरवर्षी वाढताना दिसून येत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत तब्बल 29 कोटी 16 लाख रुपयांची मद्यविक्री झाली असून, तळीरामांनी शासकीय तिजोरीत कोट्यवधीची भर घातली आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल पावने तेरा कोटी रुपयांचा अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे हे विशेष.

सरकारने नोटबंदी आणि जीएसटी हे दोन धोरणे आंमलात आणल्यानंतर देशभरातील विविध व्यवसाय डबघाईस आले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. मात्र, असे जरी असले तरी याच शासकीय तिजोरीत भर टाकण्यासाठी तळीरामांना पुढाकार घेतल्याचे प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. एप्रिल महिन्यांपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षातील केवळ सातच महिन्यांत तळीरामांनी देशी 38 लाख 22 हजार 914 बल्क लिटर, विदेशी 8 लाख 30 हजार 223 बल्क लिटर, बिअर 9 लाख 68 हजार 131 बल्क लिटर आणि वाईन 26 हजार 245 बल्क लिटर रिचवून तब्बल 29 कोटी 16 लाख 18 हजार 654 रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला आहे. एकूणच ही आकडेवारी जिल्ह्याच्या महसुलाला कितपत बळकट करते हे येणारा काळच ठरवणार आहे.

बंधने असलेल्या महिन्यांत विक्री सरासरी
विधानसभा निवडणुका यंदा आॅक्टोबर महिन्यांत पार पडल्या. महिन्यात एकूण आठ ड्राय होते. यासोबतच अवैध मद्यविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांची करडी नजर होती. त्यामुळेच या महिन्यांत केवळ तीन कोटी 18 लाख 18 हजार 160 रुपयांचा महसूल मद्यविक्रीतून जमा झाला. तर इतर महिन्यांत ही आकडेवारी दुपटीने असल्याचे दिसून येते.
 

असा मिळाला मद्यविक्रीतून महसूल

महिना                            मिळालेला महसूल

एप्रिल                     तीन कोटी 54 लाख 17 हजार 839

मे                          चार कोटी 56 लाख 45 हजार 88

जून                        चार कोटी 31 लाख 96 हजार 800

जुलै                        चार कोटी 22 लाख 11 हजार 300

ऑगस्ट                चार कोटी पाच लाख 38 हजार 490

सप्टेंबर                  पाच कोटी 27 लाख 90 हजार 977

ऑक्टोबर             तीन कोटी 18 लाख 18 हजार 160 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com