सर्वच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नागपूर - अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी असले तरी मागेल त्या सर्वच शेकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नागपूर - अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी असले तरी मागेल त्या सर्वच शेकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 40 हजार शेतकऱ्यांना लाभ झाला असून जळवास 40 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळला नसल्याने त्यांना कर्ज मिळण्याच्या प्रश्‍नावर मुद्‌गल म्हणाले, यंदा 1100 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येईल. मागील वर्षी 800 वर गावांमधील शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड देण्यात आले. यावर्षी एक हजार गावातील शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड देण्यात येईल. जलसंधारणाच्या कामांना अधिक गती देण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेसाठी मागील वर्षी 95 कोटींची मागणी होती. त्यातील 85 कोटींचा निधी उपलब्ध झाला. 410 कामांच्या अद्याप निविदा काढणे बाकी आहे. लवकरच त्या काढून जूनपूर्वी सर्व काम करण्यात येईल. 

बोगस बियाणे कंपन्यांची नावे प्रसिध्द करणार 
बोंडअळीच्या प्रश्‍नावर मुद्‌गल म्हणाले, की बियाणे विक्री करणाऱ्यो 240 कंपन्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यांची नावे शासनाकडून मागण्यात आली असून ती मिळताच सर्वांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील. बोगस बियाणाच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करून विक्री केंद्राची तपासणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विकास कामांसाठी भूसंपादनाच्या कारवाईला गती देण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

Web Title: All the farmers will get the loan