चहुबाजूला पाणी तरीही गांव तहानलेलीच

संदीप रायपुरे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

गोंड पिपरी (चंद्रपूर) : गावाला लागून वर्धा नदी ओव्हरफ्लो झाली.आजुबाजूला नाले ओसंडून वाहत आहेत.गावाच्या चहूबाजुला पाणीच पाणी असतांना सकमुरसह सात गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.आठ दिवसापासून पिण्याचे पाणी मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासन, लोकप्रतिनिधीविरोधात गावकरी प्रंचड संतापले आहेत.

गोंड पिपरी (चंद्रपूर) : गावाला लागून वर्धा नदी ओव्हरफ्लो झाली.आजुबाजूला नाले ओसंडून वाहत आहेत.गावाच्या चहूबाजुला पाणीच पाणी असतांना सकमुरसह सात गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.आठ दिवसापासून पिण्याचे पाणी मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासन, लोकप्रतिनिधीविरोधात गावकरी प्रंचड संतापले आहेत.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सकमुर, कुडेनाँदगाव, हेटीनांदगाव व परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केल्या जातो. चंद्रपुरातील ठाकूर नामक ठेकेदाराकडे या योजनेला सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. पण त्यांनी योजनेवर काम करणार्या मजुरांचे पगार दिले नाही. आता तर मोटर जळाल्याचे सांगत पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे गेल्या आठ दिवसापासून सात गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसापासुन सूरू असलेल्या मुसळधार पावसाने वर्धा नदीला पूर आला. सिमेवरील आंतरराज्यीय पोडसा पुलावर पाणी आहे. अशात सकमुरजवळील नाल्याला डाब मारल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. सकमुरच्या चहूकडे पाणीच पाणी आहे. मात्र या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाहीआहे.परिसरातील सात गावातील नागरिकात पाण्याअभावी हाहाकार माजला आहे. कुडेनांदगावात तर नाल्यातील पाणी लोकांना प्यावे लागत आहे.

एवढी गंभीर स्थीती असतांना याकडे ना प्रशासनाचे लक्षनाही लोकप्रतिनिधींचे.
यामुळे नागरिकांत संतापच संताप आहे. यासंदर्भात योजनेचे अभियंता पूल्लावार यांनी तिन दिवसात पाणीपूरवठा सूरू करणार असल्याचे सांगितले.

रेचनकरांचे जोपासले दायित्व....
आठ दिवसापासून गावात पिण्याचे पाणी नाही.गावात तापाची साथ अशा अवस्थेत नागरिकांचे हाल बघता सकमुरचे उपसरपंच अशोक रेचनकर यांनी आठ दिवसापासून टँकरने पाणीपुरवठा केला.वेडगावातून पिण्याचे पाणी आणून गावकर्यांना वितरीत केले जात आहे.
- अशोक रेचनकर, उपसरपंच सकमुर

Web Title: All over water but still villager is thirsty