ink
ink

Loksabha 2019 : बिगुल वाजला; आखाडा सज्ज

अकाेला : लाेकसभा निवडणुकीचे बिगुल रविवारी वाजले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता निवडणूक प्रचाराचा धूरळा उडणार असून, विधानसभा निवडणुकांची पेरणीही यानिमित्ताने हाेणार आहे.  लाेकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत.

अकाेला लाेकसभा मतदार संघ गत पंधरा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. विकासा एेवजी जातीय समीकरणाचा स्थानिक मतदारांवर चांगला पगडा असल्यामुळे येथे जाती आधारित मतदान पाहायला मिळते. परिणामी एकेकाळी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपाच्या संजय धाेत्रे यांनी सुरुंग लावला आहे. मागील तीन निवडणुकांत भाजपचे अॅड. संजय धाेत्रे यांनी हॅट्‍ट्रीक साधत भारिपचे साेशल इंजिनिअरिंग व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा धूव्वा उडवला हाेता. यावेळी सुद्धा भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक राजकारणात जातीय समीकरणच प्रभावी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आता निवडणूक आयाेगाने मतदानाचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे इच्छुक शड्डू ठाेकून प्रत्यक्ष मैदानात उतरण्यासाठी तयार झाले आहेत. प्रचारचे नारळ याआधीच फुटल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

मतदार संघातील महत्‍त्वाचे प्रश्न
- आैद्याेगिकरणाचा अभाव, बेराेजगारी
- पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव
- रखडलेले सिंचन आणि इतर प्रकल्प
- शहराचा विकास ठप्प; रस्त्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार
- शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचे ग्रहण
- विकास आराखड नसल्याने मागासलेपणा
- शेती व प्रक्रिया उद्याेग ठप्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com