पाणी टंचाईबाबत सर्व उपाय योजना तातडीने राबवा : आमदार ॲड. आकाश फुंडकर

All the schemes for water scarcity should be implemented promptly says MLA Aakash Phundkar
All the schemes for water scarcity should be implemented promptly says MLA Aakash Phundkar

खामगांव : मतदार संघात यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई संभाव्य कृती आराखडा व टंचाई प्रतिबंधात्मक कृती आराखडा त्वरीत सादर करण्याबाबत महत्वाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी संभाव्य पाणी टंचाई पहाता सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना आदेश दिले. यंदा पाऊस कमी पडल्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. पाणीटंचाई दुर करण्यासाठी जवळचे स्त्रोत शोधा, टँकर लावा व विहीरी अधिग्रहीत करा. तसेच इतर तातडीच्या उपाययोजना राबवा. आज आपल्या सर्वांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सर्व प्रकल्पात अत्यल्पसाठा आहे, अशा बिकट स्‍थितीत सर्व अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व गावकऱ्यांनी सोबत येणे गरजेचे आहे. पाणी टंचाई या अत्यावश्यक कामात कामचुकारपणा करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. पाणी टंचाईचा गाव आराखडा दोन तीन दिवसात सादर करा. पाणी पुरवठा विहीरीवर लोडशेडींग सुरु होणार नाही यासाठी जिल्हाधिकारीशी चर्चा करणार.

शासनाकडून लागेल तेवढा निधी इतर मदत मिळवून देण्याची ग्वाही ही आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी दिली. मागील आराखडयामध्ये अंमलबजावणी केली नसणाऱ्या दोषींवर यावर्षी कठोर कार्यवाही करणार. विहीर अधिग्रहण, टँकर सर्व बाबींचा समावेश करुनच अराखडा दयावा. मागील अधिग्रहण चे पैसे 4 ते 5 दिवसात खात्यामध्ये जमा होतील. सर्व सरपंच यांनी परीपुर्ण आराखडा दयावा. विद्युत वितरण कंपनीने लोडशेडींग बददल संबंधित अधिकाऱ्यांशी यर्चा करुन जिल्हाधिकारी यांच्याकडून संयुक्त समीत बनविण्यात येईल. धरणावरुन पाणी उपसणे बंद झाले पाहिजे. सरपंच यांनी गावकऱ्यांमध्ये समाज प्रबोधन करावे. लेखी तक्रार द्यावी. येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कारण पाणी टंचाई सर्वांना सारखीच राहणार आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी चव्हाण, तहसिलदार रसाळ, गटविकास अधिकारी शिंदे, यांचेसह जिल्हा परिषद सभापती डॉ गोपाल गव्हाळे, पंचायत समिती सभापती उर्मिलाताई शदरचंद्र गायकी, जि. प. सदस्या मानकर मालुबाई ज्ञानदेव, टिकार जयश्री विनोद, उंबरकार वर्षा अंबादास, चिमनकार आशाबाई ज्ञानदेव, गव्हाळे गोपाल रामदास, बोंबटकार पुंडलिक भिकाजी, महाले रेखा चंद्रशेखर, काळे विलास त्र्यंबक, गायकी उर्मिला शरदचंद्र, महाले दुर्गा विजय, तेलंग राजेश बाबुराव, गावंडे तुषार विलासराव, बोधे शांताराम नाथा, सोळंके भगवानसिंग उकर्डा, मोरे रेखा युवराज, मुंढे शितल समाधान, साबळे हरसिंग महादू, बंड रामेश्वर तुकाराम, यासह सरपंच उपसरपंच यांची उपस्थिती होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com