बनावट सोने विकणारे तिघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

अमरावती : खरे सोन्याचे नाणे (गिन्नी) दाखवून बनावट सोने विकणारे त्रिकूट स्थानिक गुन्हेशाखेच्या हाती लागले. त्यांच्याकडून 1 लाख 30 हजारांचे खरे सोने, 80 लोखंडी वायसर, 4 मोबाईल, एक दुचाकी असा 1 लाख 93 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

अमरावती : खरे सोन्याचे नाणे (गिन्नी) दाखवून बनावट सोने विकणारे त्रिकूट स्थानिक गुन्हेशाखेच्या हाती लागले. त्यांच्याकडून 1 लाख 30 हजारांचे खरे सोने, 80 लोखंडी वायसर, 4 मोबाईल, एक दुचाकी असा 1 लाख 93 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
महेंद्र मनोहर पाटील (वय 49 रा. शहापूर पुनर्वसन), मोहंमद शहा बाबा शहा (वय 65 रा. नया दायरा, वरुड) यांच्यासह प्रकाश यशवंत इंगळे (वय 42 रा. चिखल सावंगी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. त्यांना स्थानिक गुन्हेशाखेचे प्राथमिक चौकशीनंतर मोर्शी पोलिसांच्या ताब्यात दिले. मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावर बनावट सोने विकण्यासाठी तिघे हजर होते. त्याच ठिकाणी दुचाकीने पुन्हा दोघे व्यक्ती आले. आधी उभ्या असलेल्या तिघांपैकी एकाने एक डबा काढून ग्राहक म्हणून आलेल्या दोघांना दाखविला. त्याचवेळी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी तिघांनाही पकडले. स्टीलच्या डब्याची पाहणी केली असता, त्यात सोन्याच्या ओरिजनल 14 नाणे (गिन्नी) ज्यांची किंमत 1 लाख 30 हजार रुपये आहे, त्या आढळल्या. शिवाय गिन्नीच्या आकाराचे लोखंडी 80 वायसरही त्यात होते. शिवाय त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.
7 लाखांत अर्धा किलो सोने
सात लाख रुपयांत अर्धा किलो सोने विकत घेण्यासाठी कळमगव्हाण येथील दोन व्यक्ती आल्या होत्या. पोलिस पोहोचल्याने त्यांची फसवणूक होण्यापासून वाचली.
दोघांविरुद्ध पूर्वीचेही गुन्हे
अटकेतील तिघांपैकी महेंद्र पाटील व मोहंमद शहा या दोघांविरुद्ध पूर्वीचे गुन्हे तळेगाव द., वरुड, चांदूरबाजार ठाण्यासह नागपूर ग्रामीणमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All three arrested for selling fake gold